बंद घराचा कडी-कोयंडा उचकटला, पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात चोरी, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून तेथील पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात घुसून चोरट्यांनी 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटला, पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात चोरी, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 5:04 PM

कोल्हापूर : इचलकरंजीत बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून तेथील पोटमाळ्यावरुन शेजारच्या (Robbery In House) घरात घुसून चोरट्यांनी 20 हजाराच्या रोकडसह 1 लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. जवाहरनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मल्लिकार्जुन चंद्रशेखर गंजार (वय 26) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे (Robbery In House).

मल्लिकार्जुन गंजार हा आई, वडील आणि भावासमवेत जवाहरनगर परिसरातील सरोजिनी हॉस्पिटल लगत राहण्यास आहे. चार दिवसांपूर्वी गंजारचे आई-वडील आणि भाऊ कर्नाटकातील बनट्टी गावी नातेवाईकांकडे गेले होते. तर मल्लिकार्जुन हा 17 नोव्हेंबर रोजी गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेला होता.

18 नोव्हेंबर रोजी गणपतीपुळे येथून परतल्यानंतर तो रात्री मित्राच्या घरीच थांबला. 19 रोजी सकाळच्या सुमारास मल्लिकार्जुनच्या आईने फोनवरुन शेजारी राहणार्‍या दुंडाप्पा यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे सांगत त्याठिकाणी जावून माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार, मल्लिकार्जुनने घटनास्थळी जावून पाहिले असता दुंडाप्पा यांच्या घरातील काहीच साहित्य चोरीस गेले नसल्याचे दिसून आले. मात्र, त्यांच्या पोटमाळ्यावरुन चोरटे आपल्या घरात गेल्याचा संशय आल्याने मल्लिाकार्जुनने आपल्या घराचा दरवाजा उघडून पाहिला. तेव्हा त्याच्याच घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून आतील 20 हजार रुपयांची रोकड, 60 हजार रुपये किंमतीची दीड तोळ्याची सोन्याची चेन, 30 हजार रुपये किंमतीची पाऊण तोळ्याची बोरमाळ, 16 हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे लहान मणी आणि 16 हजार रुपयांचे चार ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे निदर्शनास आले (Robbery In House).

त्यानंतर त्याने तात्काळ शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणात चोरट्यांचा तपास करत आहेत.

Robbery In House

संबंधित बातम्या :

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजीत अवैधरित्या गुटखा वाहतूक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करुन स्वत:ला सुतळी बॉम्बने उडवून दिले; मुंबईतील धक्कादायक घटना, प्रियकर अटकेत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.