Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मजुरांचा गोरखधंदा उघड! 100, 200 आणि 500च्या बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागावातून पोलिसांनी तिघा मजुरांना अटक केली. हे तिधे जण बनावट नोटा खपवण्याचा गोरखधंदा करत होते. या तिघांकडून एक लाख 88 हजार रुपयांच्या खोट्या नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.

मजुरांचा गोरखधंदा उघड! 100, 200 आणि 500च्या बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 8:49 AM

कोल्हापूर : दैनंदिन आर्थिक व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या नोटांबाबत धक्कादायक (Kolhapur crime news) माहिती समोर आलीय. 100, 200 आणि 500 च्या खोटा नोटा (Fake notes) खपवणारी एक टोळी सक्रिय होती. या टोळीच्या पोलिसांनी (Kolhapur Police) मुसक्या आवळल्या आहे. कोल्हापुरातून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण तिघा जणांना अटक करण्यात आलीय. हे तिघेही जण मजूर असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल दीड लाख रुपयांपेक्षाही अधिकच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. तसंच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्यदेखील पोलिसांनी जप्त केलंय. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही खोट्या नोटा खपवण्याच आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुशंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागावातून पोलिसांनी तिघा मजुरांना अटक केली. हे तिधे जण बनावट नोटा खपवण्याचा गोरखधंदा करत होते. या तिघांकडून एक लाख 88 हजार रुपयांच्या खोट्या नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. कर्नाटकातून ही जप्तीची कारवाई करण्यात आलीय. आता या तिघा आरोपींची कसून चौकशी कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस करत आहेत. नेमक्या या खोट्या नोटा खपवल्या कशा जात होत्या, हे या चौकशीतून आता समोर येईल.

हे सुद्धा वाचा

खरी नोट कशी ओळखाल?

अनेकदा चलनात खोट्या नोटाही वापरात असतात. त्यामुळे रोखीचे व्यवहार करताना नोटांची पडताळणी करजे गरजेचं असतं. खरी नोट कोणती आणि खोटी नोट कोणती, यातील फरक जाणून घेण्यासाठी काही सूचनाही आरबीआय कडून देण्यात आल्या आहेत. खऱ्या नोटेची पडताळणी करण्यासाठी खालील गोष्टींचा उपयोग करावा…

  • 1. नोटेवरील अनुक्रमांकातील प्रत्येक कमांक चढत्या आकाराने छापला जातो. त्यातील पहिल्या तीन सख्या सारख्याच आकारात
  • असतात.
  • 2. खऱ्या नोटेच्या कडेला तिरख्या रेघा असतात.
  • 3. प्रत्येक नोटेप्रमाणे तिरक्या रेघांची संख्या कमी-जास्त होते. शंभर रुपयांसाठी चार रेखा दोन गटा, पाचशे रुपयांची पाच रेखा तीन गटांत आणि हजार रुपयांसाठी सहा रेखा चार गटात अशी विभागण्यात आलेली आहे.
  • 4. प्रत्येक नोटेवर काऊंटरफिट नोट असा शिक्का बँकेने मारणं बंधनकारक असतं. तो आहे की नाही हे पाहावं.
  • 5. नोटेवर महात्मा गांधी यांचे चित्र वॉटरमार्कप्रमाणे दिसते.
  • 6. सुरक्षा धागाही नोटेत असतो, जो महात्मा गांधींच्या चित्राच्या डाव्या बाजूस असतो.
  • 7. अत्यंत सूक्ष्म स्वरुपात आरबीआय असेदेखील लिहिलेले असते.
  • 8. प्रत्येक नोटेवर मूल्य दर्शवणारे आयत, त्रिकोणा, गोल असे आकार छापलेले असतात.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज.
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.