कोल्हापूर : कोल्हापूरचा (Kolhapur Crime) नाद खुळा, असं म्हणतात ते उगाच नाही. कोल्हापूरच्या कळंबा (Kalamba, Kolhapur) परिसरात एका व्यक्तीने तब्बल 21 लाख रुपयांची बाईक घेतली. नाद खुळा मिरवणूक काढत, वाजत गाजत हा व्यक्ती बाईक घेऊन थाटामाटात घरी आला. पण एका रात्रीत घडलेल्या अनर्थाने 21 लाख रुपयांच्या बाईकची (Bike Fire) राख झाली. 21 लाख रुपयांची बाईक अवघ्या 15 मिनिटांत जळून खाक झाली.
कोल्हपूरच्या कळंब येथील एका रहिवाशाने 21 लाख रुपयांची महागड्या सुपरबाईकची खरेदी केली होती. या बाईकची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. 21 लाखाची बाईक आणि मिरवणूक याची चर्चा कोल्हापुरात रंगली होती. पण 21 लाखाच्या बाईकचा आनंद या इसमाला फार काळ टिकवता आला नाही.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कळंबा इथं भीषण आग लागली. या अग्नितांडवात दोन वाहनंही जळून खाक झाली. आग लागल्याचं कळताच कळंबामध्ये एकच खळबळ माजली होती. आग विझवण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाला बचावकार्य करण्यासाठी येण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पण आगीची तीव्रता प्रचंड होती. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी तातडीने पोहोचले. बचावकार्य सुरु करण्यात आलं. पण अवघ्या 15 मिनिटांत 21 लाखांच्या बाईकचा कोळसा झाला होता. डोळ्यांदेखत 21 लाख रुपयांची बाईक जळून खाक झाली. यावेळी बाईकचा मालकही हतबल झाला होता.
हौस म्हणून महागडी बाईक खरेदी करुन मिरवणूक काढलेल्या या व्यक्तीचं प्रचंड नुकसान झालं. आगीत तब्बल 40 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलाय. ही आग नेमकी कशामुळे लागली ते कळू शकलेलं नाही. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे कोणतीही जीवितहानी या आगीत झाली नाही.