Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur News: वीज पुरवठा खंडीत झाल्यानं व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा कोल्हापुरात मृत्यू! महावितरणविरोधात संताप

Kolhapur News : महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी भरपावसात सीपीआर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केलंय.

Kolhapur News: वीज पुरवठा खंडीत झाल्यानं व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा कोल्हापुरात मृत्यू! महावितरणविरोधात संताप
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 7:54 AM

कोल्हापूर : वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू (Patient on ventilator died due to electricity Cut) झालाय. कोल्हापुरातील (Kolhapur News) उचगांवमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आमेश काळे अस मृत रुग्णांचं नाव आहे. महावितरणच्या (Mahavitaran) अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी भरपावसात रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केलंय. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतलाय. फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आमेशवर गेल्या वर्षभरापासून सुरू होते. घरीच व्हेंटिलेटरवर त्याच्यावर उपचार सुरु होते. वीजबिल थकीत असल्याने 30 मे रोजी आमिशच्या घरचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला होता. गेल्या दोन दिवसापासून शेजार्‍यांकडे वीज घेऊन व्हेंटिलेटर सुरु होतं. मात्र बुधवारी सायंकाळी सर्वच वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटर बंद झाल्यानं आमिशचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांचा आक्रोश

मृत आमेश काळे यांचं वय 38 वर्ष होतं. वीज पुरवठा खंडीत होऊन आमेशचा मृत्यू झाल्यानं काळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमेश या रुग्णावर घरीच व्हेटिंलेटवर उपचार सुरु होते. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शेजारच्या घरातून विजेचं कनेक्शन देत व्हेटिलेटर सुरु करण्यात आलं होतं. पण अखेर आमेशच्या मृत्यूनंतर महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

संतापलेल्या कुटुंबीयांना महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलंय. आमेशचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यावेळी सीपीआर रुग्णालयासमोर कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जातेय.

मुसळधार पावसानं झोडपलं : पाहा व्हिडीओ

गुरुवारी कोल्हापूरला मुसळधार पावसाने झोडपलं होतं. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावासानं कोल्हापुरात हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. गाड्यांचही झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश भागात विजेचा खेळखंडोबाही झाला. तर खबरदारी म्हणून काही भागातील विजपुरवठा बंद करण्यात आला होता. दरम्यान, उचगांवात घडलेल्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.