बदलीमुळे नाराजी, कोल्हापुरात पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी नदीत उडी घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला (Kolhapur PI Suicide attempt )

बदलीमुळे नाराजी, कोल्हापुरात पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापुरात पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 2:23 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रदीप काळे यांनी नदीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अचानक बदली झाल्यामुळे काळे नाराज असल्याची चर्चा आहे. (Kolhapur PI Pradeep Kale alleged Suicide attempt by Jumping into River)

सोशल मीडियावर नाराजीची पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप काळे याआधी कार्यरत होते. मात्र काही दिवसांपूर्वी काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. बदलीच्या कारणास्तव प्रदीप काळे नाराज असल्याची चर्चा होती. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहून आभार व्यक्त केले होते.

काय होती सोशल मीडिया पोस्ट?

“ज्या पोलिस ठाण्यावर सन 2014 मध्ये पब्लिकने दगडफेक केली होती, ज्या पोलिस ठाण्यास एक अपवाद वगळता कोणीही प्रभारी अदिकारी सात-आठ महिने टिकू शकला नाही, त्या पोलीस ठाण्याला अखंडित 27 महिन्याची सेवा बजावल्यानंतर दगडपेकीचे घाव झेललेल्या पोलीस ठाण्याच्याच ठिकाणी त्याच नगरीच्या नागरिकांनी, नगराध्यक्षांनी, विविध पक्षांचे नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि माझा स्टाफ यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर फुलांचा वर्षाव करुन निरोप दिला, तो अभिमानास्पद एक क्षण”

“या यशाचे खरे हकदार माझे तत्कालीन एसपी अभिनव देशमुख सर, अॅडि. एसपी घाडगे सर, डीवायएसपी पिंगळे सर आणि काळे सर हे आहेत. त्यांच्या खंबीर आणि योग्य पाठबळामुळेच वडगांव पोलीस ठाणे, नागरिकांकडच्या उत्स्फूर्त सन्मानास पात्र ठरले आहे” अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर काही तास आधीच लिहिली होती.

चिकुर्डे पुलावरुन वारणा नदीत उडी

प्रदीप काळे यांनी आज कोल्हापुरातील चिकुर्डे पुलावरुन वारणा नदीत उडी घेतली. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. काळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?

प्रसिद्ध पार्श्वगायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, ‘गायिका’ मावशी-‘संगीतकार’ काका अटकेत

Kolhapur PI Pradeep Kale alleged Suicide attempt by Jumping into River)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.