महाराष्ट्रात २२ ते २४ वर्षांच्या मुलांना गँगवारची नशा, शॉर्टस पाहाल तर धक्का बसेल, एकटा सापडला तर काम तमाम

या गल्ली गल्लीतल्या मुलांचे आदर्श आहेत, त्यांच्याच शहरातील भाई, ज्यांच्यावर जीवे मारण्याचा, हत्या केल्याचा, बळजबरीने पैसा, जमीन हाडपण्याचे आरोप आहेत. ज्यांनी जेलमध्ये दिवस काढले आहेत. ही फक्त

महाराष्ट्रात २२ ते २४ वर्षांच्या मुलांना गँगवारची नशा, शॉर्टस पाहाल तर धक्का बसेल, एकटा सापडला तर काम तमाम
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 12:29 PM

कोल्हापूर : असाच तयार होतो गल्लीतला भाई, गल्लीतला गुंड, आधी हाफमर्डर. एका दुकानदाराला चौकात झोडपलं. यानंतर याची शहरभर चर्चा. व्यापाऱ्याकडून वर्गणीच्या नावावर खंडणी, मग पुढे जावून स्वत:साठी खंडणी, स्पोर्टस बाईक, फोर व्हीलर, तरुण मुलांचा मागे ताफा, शेकडो मुलांसोबत एकाच वेळेस ढाब्यावर मटणचिकनवर ताव मारायला. भाऊला तेवढीच मोठी बॅकिंग.यापुढे प्रॉपर्टी आणि जमिनीच्या लफड्यात एक एकेला धमकी, त्यात मोठी कमाई.रिअल इस्टेट क्षेत्रात धमक्यांसाठी वापर, पुढे त्यातही पार्टनशीप.

भाऊ आधी मोकळा होता, काही दिवसांनी कसा पैशांनी झाकला गेला. पण पैसा वैगरे काही नाही, डोक्यात फक्त मी, आपण भाई, आणि आपल्या एका शब्दावर जग कसं नाचतंय, हेच त्याला गुंडगिरीच्या नशेत दिसतं, आणि काही वर्षातच या गुंडांची हत्या होते असं उदाहरण समोर आलं आहे. कोल्हापुरात मागील महिन्यात असाच एक गुंड मारला गेला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.

कोल्हापुरातील सत्य परिस्थिती

देशात एक पिढी अशी पुढे येतेय की, ज्यांना रोजच्या जेवणाची काळजी आता राहिलेली नाहीय, या लोकांना आता काहीही करुन पैसा कमावयाचाय असंही नाही, १८ ते २५ वयात यांना फक्त भाईगिरी, गुंडगिरीची नशा चढते. मी माझं, माझा किती दबदबा यातंच हे गुन्हेगार होतात आणि संपून जातात.एका बाईकवर शहरभर फेरी मारली की सर्व शहर आपल्या, टाचेखाली आल्यासारखं यांना वाटतं.

दबदबा निर्माण काहीही करुन पैसा कमवणाऱ्यांच्या स्पर्धेत पळायचं आहे, एवढं पळायचंय, एवढं पळायचंय की मृत्यूने शेवट झाला तरी चालेल. पण आपल्याला कुणीतरी पैशाने आणि आपल्या ताकदीने, आपल्या हाणामाऱ्यांनी ओळखलं पाहिजे.

या गल्ली गल्लीतल्या मुलांचे आदर्श आहेत, त्यांच्याच शहरातील भाई, ज्यांच्यावर जीवे मारण्याचा, हत्या केल्याचा, बळजबरीने पैसा, जमीन हाडपण्याचे आरोप आहेत. ज्यांनी जेलमध्ये दिवस काढले आहेत. ही फक्त,एक आदर्श राजा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीची स्थिती नाहीय, ही संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती होत चालली आहे.

कुमार गायकवाड, वय २४, फॅन्स हजारावर तो फक्त २४ वर्षांचा होता, अवघ्या २४ वर्ष वयात त्याच्यावर हत्या, मारामारी, हत्येच्या प्रयत्न करण्याचे गुन्हे होते, त्याची सिनेमात असते तशी वट होती, तशी गँग इन्स्टावर तरी दिसते, समोर गँग नव्हती असं नाही, त्याच्या मागावरही अनेक जण होते.

तो जेलबाहेर आला की शेकडो मोटारसायकलींची रॅली

तो जेलबाहेर आला की मोटारसायकलींची त्याच्या मागे रॅली निघायची. तो स्वत:ला किंग ऑफ कोल्हापूर म्हणायचा. इन्स्टाग्रामवर भाऊच्या बड्डेचे रिल्स हिट व्हायचे, महाराष्ट्रात असा हा एकच भाऊ नाही, की त्याचे रिल्स इन्स्टाग्रामवर हिट होत आहेत.

मात्र त्याला गाठलं, सपासप वार करत संपवलं

भाऊ गँगवारमध्ये मारला गेला, तरी देखील भावाचा जन्मदिवस ते मृत्यू दिवसाची तारीख काही तरुणांनी हातावर गोंधून घेतली. हा गुंड, पण इतर गँगच्या गुंडांनी सपासप वार करुन त्याची सिने स्टाईल भर चौकात हत्या केली.

प्रेत यात्रेला स्मशानाबाहेर गर्दी

या अवघ्या २४ वर्षाच्या मुलाला ज्याला मिशी फुटायला काही महिने झाले, या मुलाचा चाहता वर्ग एवढा होता की, स्मशानात जागा मिळत नव्हती, स्मशानाबाहेरच्या इमारतीच्या छतावरही तरुणांनी गर्दी केली होती.

हे व्हीडिओ नीट पाहिले तर यात दिसत होती फक्त तरुणाई, ही तरुणाई कोणता आदर्श घेऊन गुन्हेगारांची चाहती होतेय हेच समजायला मार्ग नाही.

तुम्ही हत्या, हत्येचा प्रयत्न, मारामारी, जबरी वसुली यात जेलवारी करुन आलेल्या बहुतांश युवकांचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहा, त्या भाऊंचे चाहते पाहा, हे सर्व महाराष्ट्रात दिसतंय. असं म्हणतात की देशातील युवक हे देशाचं भवितव्य असतं, पण हे युवक अशा लोकांना फॉलो करत असतील, अशा गुंड तरुणांचे चाहते होत असतील, तर राज्याचं देशाचं पुढचं भवितव्य काय असेल.

आता कुमारचा मामा आणि आई कुमारच्या हत्या झाली, मारेकऱ्यांना अटक करा, त्यांना शिक्षा करा, या मागणीसाठी पोलीस स्टेशनवर जातात, यात मागणीसाठी कधी सोशल मीडियावर त्यांचे व्हीडिओ दिसतात.पण शेवटी गुन्हेगारीचा अंतच वाईट असतो, मुळशी सिनेमातल्या त्या संवादासारखा, “गुन्हेगारांची पोरं भिक मागतील आणि होतील आमच्या जागी गुन्हेगार.”

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.