उच्चभ्रू वसाहतीतच थाटला होता वेश्या व्यवसाय, संशयितांनी लढवलेली शक्कल पाहून पोलीस पथकही चक्रावले, असं काय घडलं ?
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या एका उच्चभ्रू वस्तीत पोलीसांनी मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची बाब उघडकीस आणली आहे.
रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : मोठ्या दिमाखात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातच्या हद्दीत असलेल्या एका उच्चभ्रू वस्तीत स्पा सेंटर सुरू होते. मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुषांची रेलचेल असायची. स्पा साठी अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्पा सेंटरच्या बाबतीत खळबळजनक बाब समोर आली आहे. स्पा सेंटरच्या आडून स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने हा छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून हा छापा टाकल्याने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय थाटण्याचे प्रकार समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या या स्पा सेंटरच्या कारवाईने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहत असलेल्या पिंपळे सौदागरची ओळख आहे. याच ठिकाणी बहुमजली इमारतीत एक स्पा सेंटर सुरू होते.
स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या मालकांनी अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू केला होता, त्यामध्ये महिलांसह पुरुषांचाही सहभाग होता.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, त्याच पार्श्वभूमीवर पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून मोठी कारवाई केली आहे.
अनैतिक मानवी विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली आहे.
स्पा सेंटरचा मालकांनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या प्रकरणी दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत तब्बल 34 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.