Lalit Patil | ललित पाटील प्रकरणात १७ व्या आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Lalit Patil News | पुणे शहरात उघड झालेल्या ललित पाटील याच्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

Lalit Patil | ललित पाटील प्रकरणात १७ व्या आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Lalit Patil
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 3:49 PM

मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil case) प्रकरणात राज्यातील तीन शहरांमध्ये पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरूच आहे. ललित पाटील याच्याशी संबंधित सर्व पैलूंचा पुणे, नाशिक आणि मुंबई पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणातील १७ व्या आरोपीला अटक केली आहे. साकीनाका पोलिसांनी ही कारवाई करत कुर्ला येथून अमीर अतिक शेख नावाच्या आरोपीला अटक केली.

आरोपी अमिर हा ललितचा साथीदार होता आणि तो त्याच्याकडून माल खरेदी करून मुंबईत पुरवायचा, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. तसेच मीर अतीक शेख याने ललितला ड्रग्ज फॅक्टरी बांधण्यासाठी आर्थिक मदत केली होती, असा आरोपही त्याच्यावर आहे.

पोलिसांनी आज त्याला अंधेरी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अमीर अतिक शेखच्या अटकेनंतर आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता बळावली आहे.

ललित पाटील प्रकरणात उद्योगपतीला अटक

दरम्यान या प्रकरणात आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. उद्योगपती आणि रोजरी एजुकेशन ग्रुपचे संचालक विनय आरान्हा याला अटक करण्यात आली. विनय आरान्हा याच्यावर ललित पाटील याला मदत केल्याचा आरोप आहे. विनय आरान्हा याला अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) अटक केली होती. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. ससून रुग्णालयातच त्यांची ओळख ललित पाटील याच्याशी झाली होती. आता पुणे पोलिसांनी रुग्णालयातून त्याला पुन्हा अटक केली. ललित पाटील आणि विनय आरन्हा यांची ओळख ससून रुग्णालयातून वार्ड क्रमांक 16 मध्ये झाली होती. त्यांनी ललित पाटील याला मदत केल्याचे समोर आले होते.

ललित पाटील याचे आर्थिक कनेक्शन तपासातून समोर

ललित पाटील प्रकरणी पोलिस त्याच्या आर्थिक कनेक्शनचा शोध घेत असून त्यादरम्यान नाशिकमधील सराफाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये ही कारवाई केली आहे. ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी या सराफ व्यावसायिकाकडून आठ सोने खरेदी केली केले होते. ललित पाटील याच्याकडून ड्रग्सच्या पैशातून हे सोने खरेदी केले गेले. आता या प्रकरणात आणखी काही सराफ व्यावसायिक पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. ललित पाटील याचे सर्व आर्थिक कनेक्शन आणि गुंतवणूक पोलीस शोधून काढत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.