चालक कसाबसा निघाला, पण क्लिनर अडकला! डिझेल टँकरच्या आगीत जिवंत होरपळला

Video : लातूर-नांदेड महामार्गावर भीषण दुर्घटना! अपघातानंतर भरस्त्यात अग्नितांडवाचा थरार, पाहा

चालक कसाबसा निघाला, पण क्लिनर अडकला! डिझेल टँकरच्या आगीत जिवंत होरपळला
दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 8:54 AM

लातूर : लातूर-नांदेड महामार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये डिझेल टँकर जळून खाक झाला. यासोबत रस्त्यावरील इतर वाहनांनीही पेट घेतला. तब्बल 7 वाहनं जळून खाक झाली. या आगीत एक जण मृत्युमुखी पडला. विशेष म्हणजे ज्या टँकरने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली होती, त्या डिझेल टँकरचा चालक या अपघातातून बचावला. मात्र याच टँकरमधील त्याचा सहकारी क्लिनरवर मात्र काळाने घाला घातला.

डिझेलने भरलेला टँकर सोलापूर डेपोतून निघून अहमदपूरच्या दिशेने जात होता. लातूर-नांदेड महामार्गावर असताना डिझेल टँकर आणि ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत जबर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, यानंतर डिझेल टँकरने पेट घेतला.

या अपघातानंतर डिझेल टँकर आता पेट घेईल, अशी भीती चालकाला होतीच. त्यामुळे तो कसाबसा या अपघातातून बचावला. त्यानं लगेचच डिझेल टँकरच्या बाहेर उडी टाकली. पण या अपघातात लागलेल्या आगीमध्ये टँकर चालकाच्या पायाला जबर जखम झाली. चालक जरी बचावला गेला असला, तरी त्याचा साथीदार मात्र टँकरमधून वेळेत बाहेर पडू शकला नाही. या दुर्दैवी घटनेत चालक जिवंत होरपळला आणि त्याचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ :

या अपघातात नांदेड येथून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसलाही आगीने आपल्या कवेत घेतलं. शिवाय रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन कार आणि एक ट्रॅक्टरमध्ये देखील आग भडकली होती. एकूण सात वाहनांची या भीषण अपघातात राख झाली.

या आगीमुळे महामार्गावर हाहाकार उडाला होता. अपघातादरम्यान दोन्ही बाजूकडील वाहतूकही थांबवण्यात आली होती. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. पण तोपर्यंत वाहनांचा कोळसा झाला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.