लातुरात अमलदाराची गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्टच
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी पोलीस ठाण्यात अमलदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साहेबराव सावंत, असं आत्महत्या केलेल्या ठाणे अमलदाराचे नाव आहे. शनिवारी सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात रात्रपाळीवर होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांनी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना घडली.
लातूर : जिल्ह्यातल्या किल्लारी पोलीस (Police) ठाण्यात अमलदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. साहेबराव सावंत, असं आत्महत्या केलेल्या ठाणे अमलदाराचे नाव आहे. शनिवारी सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात (Police station) रात्रपाळीवर होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांनी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना घडली. ही घटना कळल्यावर पोलीस अधिक्षकांसह इतर अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. साहेबराव सावंत हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे समजते आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, अमलदार साहेबराव सावंत यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही कळून शकलेलं नाही.
अचानक आत्महत्येनं संशय
किल्लारी पोलीस ठाण्यातील अमलदार साहेबराव सावंत यांनी अचानक आत्महत्या केली. शनिवारी सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात रात्र पाळीवर होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांनी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना घडली. दरम्यान, आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. तर अचानक आत्महत्या केल्यानं अनेक संशय बळावतोय. याप्रकरणी पोलीस तपासात काय समोर येतं, ते पाहणं महत्वाचं ठरेल. सावंत यांच्या आत्महत्येनंतर पोलीस अधिक्षकांसह इतर अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.
आत्महत्येचं कारण अस्पष्टच
सावंत यांच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले. आता याप्रकरणी पोलीस तपास करत आहे. दरम्यान, साहेबराव सावंत यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. अचानक रात्री पाळीच्या ड्युटीवर गेल्यानंतर सावंत यांनी आत्महत्या केल्यानं त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. आता याप्रकरणाचा सखोल तापास झाल्यानंतर सत्य काय ते कळू शकेल.
इतर बातम्या