पतीपासून विभक्त झालेल्या 2 मुलांच्या आईसोबत तब्बल 9 वर्ष कुणी केलं गैरकृत्य?
लग्न, लग्नानंतर 2 मुलं, मग पतीने घराबाहेर काढलं! त्यानंतर 9 वर्ष बलात्कार! आरोपी कोण?
लातूर : लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर तब्बल 9 वर्ष शरीरसंबंध (Rape Case) ठेवल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. याप्रकरणी पीडितेनं लातूर पोलिसात (Latur Police) लग्नाचं आमिष दाखवणाऱ्या विरोधात बलात्काराचा (Latur Crime News) आरोप केला आहे. या पीडितेला आरोपीने आणि त्याच्या आईने जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय.
निलंगा तालुक्यातील वीर लहुजी साळवे नगर इथं राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेनं पोलीस तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. मी खालच्या जातीची असल्याचं सांगून माझ्यासोबत लग्न करण्यास आता नकार दिला जात असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे पीडिता दोन मुलांची आई आहे. तिचं लग्नही झालं होतं. पण नंतर ही पतीपासून विभक्त झाली होती.2007 साली पीडितेचं लग्न झालं होतं. त्यानंतर पीडिता आपल्या पतीसोबत पुण्यात राहत होती.
पतीपासून पीडितेला दोन मुलं झाली. एक 9 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांची मुलगी पीडितेला आहेत. पुण्यात राहत असतेवेळी पतीच्या ओळखीचा असणारा एक इसम त्यांच्या पुण्यातील घरी आला होता. त्यावेळी त्याने पीडितेसोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवले होते.
या बाबत पीडितेनं आपल्या पत्नीला सांगितलं. पण पतीने संतापाच्या भरात उलट पत्नीलाच मारहाण केली आणि घरातून हाकलून दिलं, असं पीडितेनं म्हटलंय. त्यानंतर शरीरसंबंध ठेवलेल्या व्यक्तीने पीडितेला लग्नाचं आमीष दाखवलं आणि तिला सोबत घेऊन गेला.
पीडिता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आरोपी जहांगीर यांच्यासोबत उदगीर येथे आली. तिथे ही जहांगीरसोबत राहत होती. उदगीरला आल्यापासून वारंवार पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर जहांगीरने बलात्कार केला, असा आरोप करण्यात आलाय.
धक्कादायक बाब म्हणजे लग्न करण्यास सांगितल्यानंतर पीडितेला आरोपीनं दिलेलं उत्तर घेऊन ती हादरलीच. तू खालच्या जातीची आहे, मी तुझ्यासोबत लग्न करु शकत नाही, असं आरोपीने पीडितेला म्हटलं. इतकंच नाही आरोपीच्या आईनेही माझ्या मुलाला नाद सोड असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
दोन मुलांची आई असलेल्या पीडितेला आता कुठे जावं आणि कुणाकडे न्याय मागावा, हे कळेनासं झालं. अखेर तिने उदगीर येथील पोलीस स्थानकात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पीडितेनं मुख्य आरोप जहांगीर खुरेशी यांच्यासह त्याची आई आणि दोघा बहिणींसह अन्य एका व्यक्तीवरही गंभीर आरोप केला आहे. पीडिता आता 32 वर्षांची असून ही घरकाम करुन मुलांचा सांभाळ करते.