देवीच्या जागरासाठी लातूरहून बोलावलं, कोल्हापुरात लॉजवर नऊ जणांची लूट
जेवणातून गुंगीचे औषध दिल्यानंतर सर्व जण बेशुद्धावस्थेत असताना भामटा नऊ जणांचे दागिने आणि पैसे घेऊन पसार झाला. (Latur Family looted at Kolhapur)
कोल्हापूर : देवीच्या जागरासाठी लातूरहून बोलावून लॉजवर नऊ जणांची लूट झाल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. जेवणातून गुंगीचे औषध देऊन नऊ जणांना लुटल्याचा आरोप आहे. तक्रारदारांना लुटणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Latur Family looted at Kolhapur Lodge)
जेवणातून गुंगी देऊन दागिन्यांची लूट
लातूरमधील नऊ जणांना देवीच्या जागराच्या बहाण्याने कोल्हापूरला बोलावण्यात आलं. लातूरमधील नऊ जण कोल्हापूरला गेले होते. बिंदू चौक परिसरातील एका लॉजमध्ये हे सर्व जण थांबले होते. नऊ जणांना आरोपीने जेवणातून गुंगीचे औषध दिले. सर्व जण बेशुद्धावस्थेत असताना रात्रीच्या वेळी भामटा नऊ जणांचे दागिने आणि पैसे घेऊन पसार झाला.
पीडित कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात
तक्रारदारांना बेशुद्ध आणि अत्यवस्थ अवस्थेत कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. लुटीच्या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरु आहे.
भंडाऱ्यात अल्पवयीन भामटे गजाआड
भंडारा जिल्ह्यात तब्बल 15 घरफोड्या करणाऱ्या सहा तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे त्यांच्या घरुन अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडी करणारे सहाही आरोपी हे भंडारा शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने बाल सुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
सोन्याचे दागिने वितळवलेल्या स्थितीत
बाहेरगावी गेलेल्या लोकांच्या घराची टेहळणी करुन नंतर कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रकार चोरटे करत असत. केवळ मजामस्ती करण्यासाठी चोरी करणाऱ्या या युवकांनी चोरी केलेले सोने नंतर विकण्यासाठी वितळवून ठेवले होते. त्यामुळे मूळ मालकाला ते कसे परत करावे, असा प्रश्न पडल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. (Latur Family looted at Kolhapur)
मुलाच्या मृत्यूची भीती दाखवून लूट
पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या कुटुंबाची सहा लाख 80 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. तुमच्या मुलावर करणी झाल्याची खोटी बतावणी भोंदू व्यक्तीने संबंधित कुटुंबाला केली. करणीमुळे मुलाचा मृत्यू संभवतो, अशी भीती दाखवून आरोपीने करणी काढण्याच्या नावाखाली कुटुंबाला सहा लाख रुपये किमतीचे कबुतर विकत घ्यायला लावले.
संबंधित बातम्या :
सहा लाखांचे कबुतर विकत घ्या, मुलाचा मृत्यू टळेल, पुण्यातील कुटुंबाची अंधश्रद्धेतून लूट
(Latur Family looted at Kolhapur Lodge)