लातुरात एक कोटीच्या विम्यासाठी मजुराची हत्या, आठ वर्षांनंतर पत्नीला अटक

एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी मजुराच्या हत्येप्रकरणी तब्बल आठ वर्षांनंतर पत्नीला अटक करण्यात आली आहे.

लातुरात एक कोटीच्या विम्यासाठी मजुराची हत्या, आठ वर्षांनंतर पत्नीला अटक
| Updated on: Dec 03, 2020 | 1:00 PM

लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी मजुराच्या हत्येप्रकरणी तब्बल आठ वर्षांनंतर (Murder For Insurance Money) पत्नीला अटक करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातल्या सुमठाणा येथील मजुराची एक कोटीच्या विम्यासाठी हत्या करण्यात आली होती. या घटनेला तब्बल आठ वर्षे उलटल्यानंतर आता त्याच्या पत्नीला सहआरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे (Murder For Insurance Money).

नेमकं प्रकरण काय?

सुतारकाम करुन उदरनिर्वाह चालवणाऱ्या अण्णाराव बनसोडे या मजुराचा त्याच्या पत्नीचा नातेवाईक असलेल्या रमेश विवेकीने एक कोटींचा विमा काढला होता. विमा काढल्याच्या काही महिन्यांनंतर अण्णाराव बनसोडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. मात्र नातेवाईक आणि विमा कंपनीने हरकत घेतल्याने पोलिसांनी तपास करुन हत्येचा गुन्हा नोंदवला होता.

मात्र, यामध्ये मयत अण्णाराव बनसोडे यांच्या पत्नीला आरोपी म्हणून ठरवण्यात आलेले नव्हते. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या फेर तपासणीनंतर घटनेच्या आठ वर्षानंतर आता पत्नीलाही अटक करण्यात आलं आहे. अण्णारावच्या पत्नीने तिच्या नातेवाइकासोबत मिळून अण्णारावची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांना आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पत्नीला सहआरोपी म्हणून अटक केली. याप्रकणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Murder For Insurance Money

संबंधित बातम्या :

प्रियकराच्या लग्नामुळे प्रेयसीचा संताप, नववधूचे केस कापले, डोळ्यात फेविक्वीक ओतलं

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

घरगुती वादातून भाच्याकडून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण, मामाचा जागीच मृत्यू