कोट्यवधींचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लाखोंचे मोबाईलही जप्त

काही दिवसांपूर्वी एका मोबाईल शॉपचे शटर उचकटून कोट्यवधी रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी (mobile thieves)  पळवले होते. गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देऊन झालेल्या लुटीमुळे शहरात गदारोळ माजला होता.

कोट्यवधींचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लाखोंचे मोबाईलही जप्त
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 4:48 PM

लातूर | 14 ऑक्टोबर 2023 : लातूरमध्ये गुन्ह्यांचे (crime case)  प्रमाण भलतेच वाढले आहे. चोरी, दरोडा, लूटमारीच्या अनेक घटना सतत कानावर पडत आहेत. त्याच वेळी दीड महिन्यापूर्वी एका मोबाईल शॉपचे शटर उचकटून कोट्यवधी रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी (mobile thieves)  पळवले होते. गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देऊन मार्केट परिसरातील मोबाईलचे शॉप फोडून कोट्यवधींचे मोबाईल लुटण्याच्या घटनेमुळे शहरात गदारोळ माजला होता. अखेर दीड महिन्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत मोबाईल लुटणाऱ्या टोळीचा (thieves arrested) पर्दाफाश केला. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

पहाटे टाकला होता धाडसी दरोडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही चोरी झाली होती. लातूर शहरामधील गांधी मार्केट परिसरात पहाटच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील मध्यवर्ती भागातील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या बालाजी टेलिकॉम शॉपचे कुलूप तोडून, शटर उचकटून चोरट्यांनी पहाटे दुकानात प्रवेश केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या दुकानापासून अवघ्या काही अंतरावरच पोलीस स्टेशन आहे. तरीही चोरट्यांनी डाव साधला.

दुकानात शिरल्यावर चोरट्यांनी विविध कंपन्यांचे मोबाईल तसेच महागडी घड्याळे असा 1 कोटी 35 लाख रुपयांचा माल चलाखीने लंपास केला होता. पोलिस तेव्हा गस्तीवर असतानाही चोरट्यांनी त्यांना गुंगारा देत ही चोरी केली. याप्रकरणी दुकानमालकाने तक्रार नोंदवल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस त्या चोरट्यांचा अथक शोध घेत होते. अखेर या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.