बाबा सिद्दीकी काही चांगला माणूस नव्हता… लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटरचे वक्तव्य

Crime News : नादिरशाह हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक लॉरेन्स बिश्नोई गँग-हाशिम बाबा शूटर योगेश कुमारचा शोध घेत होते. मथुरा येथील रिफायनरी पोलिस स्टेशन परिसरात गुरुवारी सकाळी मथुरा आणि दिल्ली पोलिसांची योगेशसोबत मोठी चकमक झाली. त्यावेळी या शार्प शूटरच्या पायात गोळी लागून तो जखमी झाला.

बाबा सिद्दीकी काही चांगला माणूस नव्हता... लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटरचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 12:01 PM

दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि मथुरा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लॉरेन्स बिश्नोई-हाशिम बाबा टोळीचा शूटर योगेश याला अटक करण्यात आली आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या महिनाभरापूर्वीच या टोळीतील आणखी एक शूटर योगेश याने दिल्लीत जिम ऑपरेटर नादिर शाहची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या आदेशावरूनच दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेला दिल्लीचा गँगस्टर हाशिम बाबा याने 12 सप्टेंबरच्या रात्री ग्रेटर कैलाश भागात जिम ऑपरेटर नादिर शाहची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोई जेव्हा तुरूंगात होता, तेव्हा तो फक्ते हाशिम बाबाच्या फोनचा वापर करायचा. ही गँग टार्गेट कसं शोधत, जेलमधून कसा संवाद साधतात, त्याचा खुलासा शूटरन केला.

याच दरम्यान लॉरेन्स बिश्नोई-हाशिम बाबा गँगचा शूटर योगेशने एक बेधडक वक्तव्य केलं आहे. ‘ “बाबा सिद्दीकी हा चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मकोका हा काही सर्वसामान्य लोकांना लागू होत नाही. आता कोणी मध्ये आलं तर नक्कीच काहीतरी घडेल..’ असं तो म्हणाला.

अशा (टार्गेट) लोकांना आधी हेरून ठेवलं जातं का आणि मग रेकी केली जाते का ? त्यावरही त्याने उत्तर दिलं. त्याबाबत स्पष्ट सांगायचं तर बरीच माहिती ( आमच्याकडे) असते आणि काही माहिती मिळते देखील. फोन असतो, नेट, गूगल सगळंकाही असतं, असं त्याने सांगितलं. ही काम फक्त पैशांसाठी केली जात नाहीत. बंधुभाव असतो. आमची गँग खूप मोठी आहे, असंही त्याने सांगितलं.

बाबा सिद्दीकी यांची हत्या

गेल्या शनिवारी रात्री, 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात 66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या आमदार पुत्राच्या जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली. तिघांन त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली. टोळीतील एका सदस्य शुभम लोणकर याने सिद्दीकींच्या हत्येशी संबंधित एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँच कसून तपास करत असून आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीशकुमार अशी त्यांची नावे आहेत. तर मेन शूटर शिवकुमार, सोशल मीडियावर पोस्ट टाकणारा शुभम लोणकर आणि हत्येचा मास्टरमाईड झिशान हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. शुभम लोणकरविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.