Lawrence Bishnoi : IPS बनावं अशी होती पित्याची इच्छा, शिकता-शिकता कसा गँगस्टर बनला मुलगा ?

Lawrence Bishnoi: आपल्या मुलांनी खूप शिकून मोठ व्हावं, आपलं नाव उज्वल करावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. अशीच इच्छा एक पोलिस कॉन्स्टेबच्या मनातही होती. आपल्या मुलाने IPS Officer बनावं असं त्यांना वाटत होतं, पण त्याऐवजी त्यांच्या मुलाने असा मार्ग पत्करला की..

Lawrence Bishnoi : IPS बनावं अशी होती पित्याची इच्छा, शिकता-शिकता कसा गँगस्टर बनला मुलगा ?
लॉरेन्स बिश्नोई
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 3:07 PM

पंजाबमधील एक जिल्हा फिरोजपूर,तिथलं गाव आहे दुतरावाली… तिथेच लविंदर सिंह यांचं कुटुंब रहायचं. लविंदर हे हरियाणा पोलिसमध्ये शिपाई पदावर कार्यर्त होते. 12 फेब्रुवारी 1993साली त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. लविंदर यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना. मुलाचं रूप खूप सुंदर, घरच्यांनी त्याला लॉरेन्स नावाने हाक मारण्यास सुरूवात केली. असं म्हटलं जातं की जन्माच्या वेळेस त्याचा चेहरा तका चमकदार होता की त्याच्या आईने त्याचं नवा लॉरेन्स ठेवलं, पण कागदोपत्री त्याचं नावं सतविंदर सिंग होतं.

आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की ही गोष्ट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची आहे. तोच लॉरेन्स बिश्नोई ज्याचं नाव सध्या राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या लॉरेन्सच्या वडिलांची अशी इच्छा होती की आपल्या मुलाने आयपीएस ऑफीसर (IPS Officer)बनावं, पण स्वत :च्या आयुष्ता मश्गुल असलेल्या लॉरेन्सने जो रास्ता निवडला, तो त्याला थेट गुन्हेगारी जगताकडे घेऊन गेला आणि तो गँगस्टर बनला. लॉरेन्स बिश्नोईच्या आईचं नाव ममता असून त्या एक गृहिणी आहेत. ‘ मी माझ्या मलाला खूप समजावलं, चुकीच्या रस्त्यावर चालतोय, मागे फिर, मी त्याची समजूतही काढली, पण त्याने काहीएक ऐकलं नाही’, असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.

12 वीपर्यंत गावात घेतलं शिक्षण

सतविंदर सिंग अर्थात लॉरेन्स बिश्नोई याचं शिक्षण गावातूनच झालं. खरंतर, लॉरेन्सच्या वडिलांनी 1992 मध्ये हरियाणा पोलिसात काम करायला सुरुवात केली, पण पाच वर्षांनी त्यांनी VRS म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि शेती करायला सुरुवात केली. लॉरेन्सने पंजाबमधील अबोहर येथून इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले आणि 2010 मध्ये तो शिक्षणासाठी चंदीगडला पोहोचला. 2011 मध्ये लॉरेन्सने चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथे विद्यार्थी संघटनेचे राजकारण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तो पंजाब विद्यापीठात गेला आणि तिथून एलएलबी करू लागला. तेथे तो पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा (SOPU) अध्यक्ष बनला.

शिक्षणापेक्षा राजकारणात रस

संघटनेचा अध्यक्ष झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याने शिक्षणाला रामराम करत पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला. पंजाब विद्यापीठाच्या राजकारणात तो प्रचंड सक्रीय झाला. तेथेच त्याची गोल्डी ब्रारशी मैत्री झाली. भारत सरकारने गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित केले आहे. परदेशातून गोल्डी ब्रार हाच लॉरेन्स बिश्नोईला आर्थिक मदत करतो, रसद पुरवतो असे म्हटले जाते. पंजाब विद्यापीठात लॉरेन्स बिश्नोईने SOPU च्या बॅनरखाली विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक जिंकण्यासाठी त्याने जोरदार प्रयत्न केले, पण त्याला यश मिळालं नाही आणि तो निवडणूक हरला.

निकालाने आयुष्याला कलाटणी

घरच्यांना लॉरेन्सकडून खूप अपेक्षा होत्या. त्याने शिकून सवरून मोठं व्हावं, आयपीएस ऑफीसर बनावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र राजकारणाच्या चक्रव्यूहात तो असा अडकला होता की तो पराभव पचवू शकलाच नाही. बदला घेण्यासाठी त्याने रिव्हॉल्व्हर विकत घेतले. आपल्या पराभवाने हताश झालेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या एका साथीदाराने एका विद्यार्थी नेत्यावर गोळीबार केला, त्यानंतर प्रथमच त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. येथून त्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली आणि त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. त्यानंतर लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार या दोघांनी गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला आणि चंदीगडसह अनेक भागात गुन्हे करण्यास सुरुवात केली.

सलमानच्या हत्येचा प्रयत्न

2014 साली लॉरेन्स बिश्नोईला राजस्थानमधून अटक करून भरतपूर तुरुंगात पाठवण्यात आले होते, मात्र त्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी पंजाबमधील मोहाली येथे नेले जात असताना तो तेथून फरार झाला होता. 2016 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईवर बॉलिवूड स्टार सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. याशिवाय त्याच्यावर 29 मे 2022 रोजी झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या हत्येचा आरोप आहे. जयपूरमध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या झाली, त्याचा आरोपही लॉरेन्सवर आहे. काही महिन्यांपूर्वी 14 एप्रिल 2024 रोजी सलमानच्या घरावर जो गोळीबार झाला, त्यातही लॉरेन्सचं नाव समोर आलं होतं.

आणि आता बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात हत्या झाल्यानंतर त्या प्रकरणातही लॉरेन्सच्या नावाची चर्चा आहे.त्याच्या गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्टही टाकली होती. पोलीसात असलेल्या वडिलांचा आदर्श न घेता, आयपीएस बनण्याच्या दिशेने प्रवास न करता हा तरूण आता कुख्यात गँगस्टर बनला असून सध्या तो गुजरातच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये कैदेत आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.