वकील पत्नीकडून शिक्षक पतीची हत्या, सीसीटीव्हीत वकील प्रियकर दिसल्याने पर्दाफाश

हत्येमागे दोन वकिलांचं डोकं असल्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करताना मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ( Lawyer wife killed Teacher Husband )

वकील पत्नीकडून शिक्षक पतीची हत्या, सीसीटीव्हीत वकील प्रियकर दिसल्याने पर्दाफाश
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 7:49 AM

पाटणा : वकील प्रियकराच्या साथीने वकील महिलेने शिक्षक पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चार लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या करण्यात आली. जमीन खरेदीच्या व्यवहारावेळी ही हत्या झाल्याने पोलिसांच्या तपासाचा रोख बदलला होता. (Lawyer wife allegedly killed Teacher Husband with Boyfriend in Bihar)

बिहारमधील पाटणा-बख्तियार भागात 19 मार्चला एका शिक्षकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी शिक्षक जमीन पाहण्यासाठी गेला होता. पोलिसांच्या चार पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासानंतर अखेर हे हत्याकांड त्याच्या वकील पत्नीनेच घडवून आणल्याचं समोर आलं. तिला साथ दिली तिच्या वकील प्रियकराने.

हत्येमागे दोन वकिलांचं डोकं

हत्येमागे दोन वकिलांचं डोकं असल्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करताना मोठं आव्हान निर्माण झालं होतं. आरोपी पत्नी प्रतिमाकुमारी आणि तिचा प्रियकर सुनील गोस्वामी यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघंही पाटण्याच्या सिव्हील कोर्टात वकिली करत होते. दोघं सतत एकत्र असायचे, पण वकिलीच्या कामाचा बहाणा पत्नी देत असल्याने शिक्षक पतीला कधी संशयही आला नाही. परंतु आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचं कट कारस्थान दोघांनी रचलं.

पतीकडे जमीन खरेदीसाठी हट्ट

कटाचा भाग म्हणजे पत्नीने पतीकडे जमीन खरेदीसाठी हट्ट धरला. अखेर शिक्षक पती राजी झाला. खरेदीसाठी जमीन पाहण्याचा दिवस ठरला. पती एका बाईकवर निघाला, तर पत्नी मुलीसोबत आपल्या स्कूटीवर बसून त्याच्या मागोमाग निघाली. पतीवर कुठे आणि कसा हल्ला होणार, याची तिला माहिती होती. त्यामुळे जाणूनबुजून तिने आपली स्कूटी थोडी मागेच ठेवली.

पतीवरील गोळीबारानंतर महिलेचा कांगावा

छपाक वॉटर पार्कजवळ पोहोचताच सुपारी घेतलेल्या गुंडांनी शिक्षक पतीला गराडा घातला. त्याच वेळी त्याची गोळी झाडून हत्या केली. काही मिनिटातच पत्नी घटनास्थळी पोहोचली. पतीला गोळी घातल्याचं पाहून तिने रडण्याचं नाटक सुरु केलं. जमीन व्यवहारासाठी सोबत घेतलेले चार लाख रुपये लुटण्याच्या उद्देशाने पतीची हत्या झाल्याचा बनाव तिने रचला. (Lawyer wife allegedly killed Teacher Husband with Boyfriend in Bihar)

वकील युगुलाने शिक्षकाच्या हत्येची सुपारी काँट्रॅक्ट किलर्सना दिली होती. चार लाखांमध्ये हा व्यवहार ठरला होता. त्यासाठी 50 हजार रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये प्रियकर दिसला आणि….

पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं, तेव्हा वकील प्रियकर सुनीलही तिथे आढळला. शिक्षकाच्या घरी त्याचं येणं-जाणं असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. पोलिसांनी कसून तपास केला असता वकील महिलेचे त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध उघड झाले आणि दोघांनीच शिक्षकाची हत्या केल्याचं समोर आलं. सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या काँट्रॅक्ट किलर्सना पोलिसांनी बक्सरमधून अटक केली.

संबंधित बातम्या :

शेतातील घरात खून, देहाचे तुकडे करत विल्हेवाट, तब्बल दहा वर्षांनी बहुचर्चित मनीष श्रीनिवास अपहरण प्रकरणाचा उलगडा

बहिणीच्या प्रेमसंबंधाची गावभर चर्चा, तिच्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी रागावलेल्या भावाचं भयानक कृत्य

(Lawyer wife allegedly killed Teacher Husband with Boyfriend in Bihar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.