महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

या आंदोलनात आंदोलनकांनी महावितरण अधिकाऱ्याच्या टेबला वर साप सोडल्याने खळबळ माजली होती. यावरून आता या कार्यकर्त्यांच्या अडचणी मोठ्या वाढल्या आहेत. कारण आता यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
महावितरणाची आंदोलकांविरोधात तक्रार
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 9:27 PM

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवासापासून वीज पुरवठ्यावरून आणि वीज तोडणीवरून (Electricity bill recovery) शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही (Swabhimani Shetkari Sanghatana) मैदानात उतरत जोरदार आंदोलन केले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली होती. असेच आंदोलन इचलकरंजीत करण्यात आले होते. मात्र या आंदोलनात आंदोलनकांनी महावितरण अधिकाऱ्याच्या टेबला वर साप सोडल्याने खळबळ माजली होती. यावरून आता या कार्यकर्त्यांच्या अडचणी मोठ्या वाढल्या आहेत. कारण आता यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरीही यावरून आक्रमक होण्याची जास्त शक्यता आहे.

तिघांना न्यायालयाने कोठडी दिली

या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकारी प्रशांत राठी यांच्या टेबलवर साप सोडल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिवसा लाईट मिळावी यासाठी आंदोलन केले होते. यात अभिषेक पाटील आणि आणखी दोघांवर हा गुन्हा दाखल झालाय. या तिघांवर गुन्हा दाखल झाला असल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिनासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

स्वाभिमानी आक्रमक होण्याची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू आहे. ही वीजबिल वसुली अशाप्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. अशाप्रकारे ऊस बिलातून शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुली होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातही जोरदार आंदोलन झाले होते. त्यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवताना राजू शेट्टी दिसून आले होते. या सरकारला शेतकऱ्यांची काही काळजी नाही, हे सरकार बेईमानांचे सरकार आहे, असे राजू शेट्टी म्हणाले होते. वीज तोडणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेली पिकं करपत आहेत.

मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोल

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढणार? बच्चूभाऊ विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश!

गरज पडल्यास उद्धव ठाकरेंना ‘त्या’ होर्डिंग्जची आठवण करून देईन: महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.