Kolhapur : आईच्या डोळ्या देखत बिबट्याचा मुलीवर हल्ला, थरारक घटनेमुळे परिसरात घबराहट

बिबट्या मुलीला खेचत होता, तेवढ्यात आईने फोडला हंबरडा, पुढे जे घडलं ते थरारक...

Kolhapur : आईच्या डोळ्या देखत बिबट्याचा मुलीवर हल्ला, थरारक घटनेमुळे परिसरात घबराहट
Leopard AttackImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 9:11 AM

कोल्हापूर : बिबट्याने (Leopard Attack) आतापर्यंत अनेक मानवी वस्तीमध्ये हल्ला केला आहे. जंगलाच्या बाजूला असलेल्या वस्तीमध्ये असे थरारक अनुभव अनेकांनी पाहिले आहेत. शेळी, कुत्रा, इतर जनावरांवरती अचानक हल्ला करुन त्यांना जीवे मारल्याचे आपण असंख्य व्हिडीओ पाहिले आहेत. अशीचं घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील उदगिरीच्या (Udgiri) जंगलात घडली आहे. डोळ्या देखत मुलीला जंगलात घेऊन जाणारा बिबट्या आईने पाहिला अन् जोराचा हंबरडा फोडला. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे.

उदगिरी जंगलात केदारलिंगवाडी आहे. वाडीच्या आजूबाजूला पुर्णपणे जंगल आहे. सकाळच्या सुमारास मुलगी आणि आई जंगलात जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले. अधिक जनावरं असल्यामुळे मुलगी एका बाजूला आणि आई एका बाजूला होती. दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मुलीच्या अंगावर जोराची झडप घातली. मुलीच्या गळ्यावर हल्ला केल्यामुळे मुलीचा जागीचं मृत्यू झाला. मुलीचं नाव मनिषा डोईफोडे असं आहे.

मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिबट्या तिला खेचून जंगलात घेऊन जात होता. परंतु मुलगी एवढ्या का शांत आहे, म्हणून आई तिला शोधू लागली. त्यावेळी आईने तिला आवाज दिला. परंतु उत्तर देत नसल्यामुळे आईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्याचवेळी बिबट्या मुलीला जंगलात घेऊन जात असल्याचं दिसून आले.

हे सुद्धा वाचा

मुलीच्या आईने आरडाओरड केल्यानंतर बिबट्या मुलीचे मृत शरीर जागीच ठेऊन जंगलात पळून गेला. हल्ला केल्याची माहिती मिळताचं तिथं वनरक्षक आणि त्यांची टीम दाखल झाली होती. जीवघेणा हल्ला झाल्यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे.

त्या परिसरात जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या लोकांनी बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.