पत्नी विमा एजंट आणि पती वीस वर्षापासून आजारी; मग पंधरा लाखासाठी पत्नीनं हद्द गाठली

मंजित सिंग गेल्या वीस वर्षापासून आजारी होते. पतिच्या आजारामुळे घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च चालवणे अवघड होऊन बसले होते, त्यामुळे पती पत्नीचा नेहमी वाद होत होता.

पत्नी विमा एजंट आणि पती वीस वर्षापासून आजारी; मग पंधरा लाखासाठी पत्नीनं हद्द गाठली
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 5:06 PM

अमृतसरः पंजाबमधील अमृतसरमध्ये (Amritsar) पैशासाठी एका पत्नीने आपल्याच नवऱ्याची हत्या (Husband Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. अमृतसर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर अशी माहिती समजली की, विमा एजंट (Insurance agent) असणाऱ्या महिलेचा पती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. पतीच्या आजरामुळे घर खर्च चालवणे अवघड होऊन बसले होते. तर मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्नही उभा राहिला होता. त्यामुळे पत्नीने विमा पॉलिसीच्या 15 लाखासाठी पतिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

पतीचा मृतदेह रस्त्यात सापडला

पोलीस अधीक्षक सुखविंदरपाल सिंग यांनी सांगितले की, 5 मे रोजी सकाळी मंजित सिंग आपली पत्नी नरिंदर कौर हिच्याबरोबर औषधासाठी रुग्णालयात गेला होता. त्यानंतर रक्ताळलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह रस्त्यात सापडला होता. त्याच्याबरोबरच त्याची पत्नीही जखमी अवस्थेत सापडली होती. त्यानंतर पत्नीने त्या अवस्थेतही पतीचा मृतदेर पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. तर जखमी झालेल्या पत्नीला सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली.

पतिच्या आजारपणामुळे घरखर्च चालवणे अवघड

मंजित सिंग यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर असे समजले की, मंजित सिंग गेल्या वीस वर्षापासून आजारी होते. पतिच्या आजारामुळे घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च चालवणे अवघड होऊन बसले होते, त्यामुळे पती पत्नीचा नेहमी वाद होत होता. पतिच्या आजारपणामुळे घरखर्च चालवणे अवघड होऊन बसल्यावर मात्र पत्नीने टोकाचे पाऊल उचलत पतिलाच ठार मारण्याची योजना तिने आखली.

पतिची 15 लाखाची विमा पॉलिसी

मंजित सिंग यांची पत्नी एलआयसी विमा प्रतिनिधी होती, तिने आपल्या पतिची 15 लाखाची विमा पॉलिसी उतरवली होती. त्या विमा पॉलिसीची वारसदार म्हणून मंजितच्या पत्नीचच नाव होतं. त्यानंतर तिला कल्पना सुचली की, पतिचा मृत्यू झाला तरच विम्याचे सगळे पैसे आपल्याला मिळतील.त्यामुळे त्यानंतर तिने आपल्या पतिच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर एक दिवस पतिला रुग्णलयात घेऊन जात असताना तिने आपल्या मनात चाललेल्या हत्येचा कट वास्तवात आणला आणि पतिची हत्या केली.

या प्रकरणानंतर पोलिसांनी हत्याप्रकरणी पत्नीला ताब्यात घेतले गेले आहे. पत्नीने आपल्या हत्येचा कट उघड होऊ नये यासाठी तिने आपल्या दोघांना लुटल्याचा बनाव केला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.