भजीवाल्याचा प्रताप! SBI बँकेच्या ATM ला बनवलं वाईन शॉप; भज्यांसह विकत होता दारु

एटीएममध्ये रक्षकांच्या मदतीने दारूची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ATM वर धाड टाकून घटनास्थळावरून दोन आरोपींना अटक केली. एटीएमची झडती घेतली असता त्यात ठेवलेल्या विदेशी दारूच्या नऊ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

भजीवाल्याचा प्रताप! SBI बँकेच्या ATM ला बनवलं वाईन शॉप; भज्यांसह विकत होता दारु
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 5:10 PM

मुजफ्फरपुर : कोण काय करेल याचा काही नेम नाही असाच काहीच प्रकार बिहारमध्ये उघडकीस आला आहे. बिहारमधील(Bihar) एका भजीवाल्याने एसबीआय बँकेच्या एटीएमला( SBI Bank ATM) वाईन शॉप बनवून टाकले आहे. हा भजीवाला एटीएमच्या बाहेर भजी विकत होता. मात्र तो भज्यांसह ग्राहकांना दारू देखील विकत होता. विशेष म्हणजे ज्या एटीएम बाहेर तो भजी विकत होता त्या एटीएम मध्येच तो दारूच्या बाटल्या लपवून ठेवत होता. अखेरीस त्याच्या या अवैध दारू विक्रीच्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या भजीवाल्यासह त्याच्या आणखी एका साथीादाराला अटक केली आहे.

ATM मध्ये सापडल्या दारुच्या बाटल्या

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एटीएममधून दारू विक्री केली जात होती. मुझफ्फरपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एटीएममधून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दारुच्या बाटल्या केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी एटीएमच्या सुरक्षारक्षकासह एका दारू व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर केले. तेथून न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. एसबीआयच्या एटीएममधून मद्यविक्री होत असल्याचा खुलासा झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

एटीएममध्ये रक्षकांच्या मदतीने दारूची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ATM वर धाड टाकून घटनास्थळावरून दोन आरोपींना अटक केली. एटीएमची झडती घेतली असता त्यात ठेवलेल्या विदेशी दारूच्या नऊ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दारु विक्रेता ATM बाहेर विकत होता भजी

या प्रकरणी अटक करण्यात आलेला दारु विक्रेता ATM बाहेर भजी विकत होता. भजी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेले ग्राहक त्याच्याकडून दारु खरेदी करत होते. तो दारुच्या बाटल्या ATM मध्ये लपवून ठेवायचा. ATM मध्ये काम करणारा सुरक्षारक्षक त्याला साथ देत होता. त्याच्या या दारु विक्रिचा कुणाला संशय येवू नये याकरीता तो ATM बाहेर भजी विकत असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

बिहारमध्ये दारु बंदी असल्याने दारु विक्रिसाठी घेतला ATM चा आधार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2020 मध्ये राज्यात कडक निर्बंध लागू करत दारुबंदीची घोषणा केलीय. त्यामुळे बिहारमध्ये दारु विक्री आणि दारु पिण्यावर बंदी आहे. बिहारमध्ये दारुबंदी असली तरी अनेक ठिकाणी दारुचे अवैध अड्डे सुरू आहेत. या भजीवाल्याने दारु विक्रिसाठी ATM चा आधार घेतला आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.