दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावला पण जाळ्यात दुसरंच घबाड सापडलं, काय घडलं नेमकं?
सांगलीत रविवारी दुपारी रिलायन्स दुकानात दरोड्याची घटना घडली. या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी लावली. मात्र नाकाबंदीत दुसरंच घबाड हाती लागली.
सांगली : शहरातील रिलायन्स शोरूममध्ये भरदिवसा दरोडा टाकत करोडोचा ऐवज पसार झाले. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरु केली आहे. सर्व पोलिसांनी दरोडेखोरांच्या वाहनाचे वर्णन सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक नाक्यावर सदर वर्णानाच्या वाहनाचा शोध सुरु आहे. यादरम्यान सांगोला नाक्यावर सदर वर्णनाचे वाहन आढळून आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरु केली. मात्र तपासणी दरोडेखोरांऐवजी दुसरेच घबाड हाती लागले. सांगोला पोलिसांनी गोव्यावरुन आणण्यात येत असलेले दारुचे 30 बॉक्स वाहनातून जप्त केले आहेत. याप्रकरणी सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी पुन्हा दरोडेखोरांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
रिलायन्स शोरुममध्ये दरोडा
सांगलीतील रिलायन्स शोरूममध्ये रविवारी दुपारी सशस्त्र दरोडा पडला. पोलीस बनून दरोडेखोर दुकानात घुसले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र उभं राहण्यास सांगत बंदुकीचा धाक दाखवत सोने लुटून पळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी तपास सुरु केला. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. सदर वर्णन केलेल्या गाडीचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
नाकाबंदीदरम्यान दरोडेखोरांच्या वाहनासारखे वाहन दिसले
स्वत: पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी ग्रामीण यंत्रणेवरुन नागरिकांना याबाबत कॉल करुन त्या गाडीचे वर्णन सांगत दरोडेखोरांना पकडण्याचे आवाहन केले होते. ते स्वत:ही सांगोला नाक्यावर थांबून वाहनांची तपासणी करीत असताना दरोड्यामध्ये वापरलेल्या वाहनांप्रमाणे असलेले एक वाहन पोलिसांना आढळले.
वाहनाची तपासणी केली असता आत दारुचे बॉक्स आढळले
सांगली पोलिसांनी देखील या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी गाडीला घेरले आणि गाडीची तपासणी केली असता आत दरोडेखोरांऐवजी 30 बॉक्स दारु सापडली. गोव्याहून ही दारु महाराष्ट्रात आणण्यात येत होती. पोलिसांनी दारुचे 30 बॉक्स जप्त केले असून, पुढील कारवाई पोलीस करत आहेत. यानंतर सांगली पोलिसांनी पुन्हा दरोड्यातील आरोपी शोधण्याकडे मार्ग वळवला आहे.