आईची नजर हटताच भामट्याने चिमुकलीला पळवलं, 24 तास उलटूनही शोध नाही

नाशिक जिल्हा रुग्णालयात शनिवारी एका भामट्याने आईची नजर चुकवत एका चिमुकलीला पळवून नेलं आहे. मुलीला पळवून नेत असताना सदरील व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पण त्याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.

आईची नजर हटताच भामट्याने चिमुकलीला पळवलं, 24 तास उलटूनही शोध नाही
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 5:34 PM

नाशिक : जिल्हा रुग्णालयात एका भामट्याने दीड वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेल्याच्या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत. तरीही या भामट्याच्या शोध लावण्यात नाशिक पोलिसांना यश आलेलं नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयात शनिवारी एका भामट्याने आईची नजर चुकवत एका चिमुकलीला पळवून नेलं आहे. मुलीला पळवून नेत असताना सदरील व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पण त्याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.(Little girl kidnapped from Nashik district hospital)

आईने लक्ष ठेवायला सांगितलं, पण…

प्रतिभा गौड असं अपहरण झालेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे. चिमुकलीची आई संगीता गौड आपल्या बहिणीच्या प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात आली होती. रुग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी संगीता गौड यांची धावपळ सुरु होती. त्यावेळी मुलगी झोपल्याने संगीता यांनी चिमुकलीला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले. तिथे बाजूला बसलेल्या एका व्यक्तीला मुलीकडे लक्ष देण्यास सांगितलं आणि संगीता आपल्या बहिणीचा रिपोर्ट सादर करण्यासाठी गेल्या. त्यावेळी या भामट्याने मुलीला खांद्यावर घेत रुग्णालयात पलायन केलं. चिमुकलीच्या अपहरणाचा हा प्रकार सीटीटीव्हीत कैद झाला आहे.

नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर आरोप

घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय प्रशासनानं पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनीही सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला आहे. पण या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना या आरोपीचा शोध लागलेला नाही. संगीता गौड आपल्या बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आल्या होत्या. पण रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण प्रक्रियेला मोठा कालावधी लागला. जिल्हा रुग्णालयाने वेळीच उपचारासाठी दाखल करुन घेतलं असतं तर ही घटना घडली नसती असा आरोप चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दरम्यान, कालपासून नाशिक पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पण अद्याप पोलिसांना या प्रकरणात यश आलेलं दिसत नाही. या घटनेमुळे नाशिक शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी तर सक्रिय झाली नाही ना? अशी भीती आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार, ठाण्यात 19 वर्षीय तरुणावर गुन्हा

महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात, गोड बोलून नायजेरियन नागरिकाकडून साडे दहा लाखांचा गंडा

Little girl kidnapped from Nashik district hospital

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.