दोघेही लिव्ह इन मध्ये एकमेकांसोबत सुखात राहत होते, पण दोघांच्या नातेवाईकांची एन्ट्री झाली अन्…

पतीच्या निधनानंतर ती दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली. मग दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. पण हे रिलेशन तिला चांगलेच महागात पडले आहे.

दोघेही लिव्ह इन मध्ये एकमेकांसोबत सुखात राहत होते, पण दोघांच्या नातेवाईकांची एन्ट्री झाली अन्...
क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 1:00 PM

सिवनी : लिव्ह इन पार्टनरकडून हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मध्य प्रदेशातील सिवनी येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरनेच प्रेयसीची हत्या केली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला अटक केली आहे. वैजयंती असे मयत महिलेचे नाव आहे, तर दिनेश असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पतीच्या निधनानंतर महिला आरोपीसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती

वैजयंती हिच्या पतीचे निधन झाले होते. तिला 16 वर्षाचा मुलगाही आहे. पतीच्या निधनानंतर काही दिवसांनी तिची दिनेशशी ओळख झाली होती. मग दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर लिव्ह इन मध्ये राहण्याचा दोघांनी निर्णय घेतला. दिनेश हा अविवाहित होता. दोघांच्याही घरच्यांना त्यांचे लिव्ह इन रिलेशन मान्य होते. काही दिवस सर्व सुरळीत सुरु होते.

नातेवाईकांच्या येण्यावरुन दोघांमध्ये वाद व्हायचे

काही दिवसांनी वैजयंतीच्या नातेवाईकांचे घरी येणे-जाणे सुरु झाले. नातेवाईकांच्या वारंवार येणे-जाणे वाढल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागले. हळूहळू हे वाद वाढू लागले. मंगळवारीही याच कारणातून त्यांच्यात वाद झाला आणि दिनेशने चाकूने वार करुन वैजयंतीची हत्या केली. त्यानंतर दिनेश तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या मुलाच्या जबानीवरुन पोलिसांनी दिनेशविरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.