फेसबुकवर मैत्री, चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय आला अन्…

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. मग समोरचा प्रियकर कोणत्या पार्श्वभूमीचा आहे याचा विचारही अनेक तरुणींकडून केला जात नाही.

फेसबुकवर मैत्री, चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय आला अन्...
तब्बल 12 वर्षांनंतर पत्नी जिवंत सापडलीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 12:34 AM

गोरखपूर : उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे. प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या ‘लिव्ह इन पार्टनर”नेच हत्येचा कट रचल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे या दोघांचे प्रेमसंबंध फेसबुकच्या माध्यमातून जुळले होते. सुरुवातीला मैत्री होऊन नंतर दोघांच्या प्रेमाचा धागा घट्ट झाला होता. मात्र पुढील काळामध्ये प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय आल्याने लिव्ह इन पार्टनरने बाकी कुठलाच विचार न करता थेट प्रेयसीला संपवण्याचा निर्धार केला. गोरखपूर परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्रीला हा कट यशस्वी केला गेला. या घटनेची माहिती उजेडात आल्यानंतर पोलिसांसह परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.

हत्येचा उलगडा झाल्यानंतर आरोपीला अटक

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. मग समोरचा प्रियकर कोणत्या पार्श्वभूमीचा आहे याचा विचारही अनेक तरुणींकडून केला जात नाही. तशाच प्रकारे गोरखपुरमधील तरुणी फेसबुक मित्र असलेल्या तरुणाच्या जाळ्यात अडकली होती.

मात्र नंतर तिच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या मारुती नंदन या तरुणाने तिला चारित्र्यावर संशय घेत संपवले. या धक्कादायक सत्याचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये मारुती नंदन या आरोपी तरुणाला अटक केली.

हे सुद्धा वाचा

आरोपीविरोधात हत्या तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्याच्या कटामध्ये सामील असलेल्या इतर आरोपींचाही शोध घेत आहे.

आधी मारहाण केली मग गळा दाबून केली हत्या

आरोपी मारुती नंदन याने प्रेयसी असलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीला आधी मारहाण केली. यात ती खाली पडली. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. प्रेयसीला ठार मारल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून दिला होता.

पोलिसांना हा अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र मृतदेहाच्या जवळ रेल्वेचा पास सापडल्याने त्या आधारे तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यााधारे पोलीस तरुणीच्या घरापर्यंत पोहोचले.

तरुणीने चार वर्षांपूर्वी सोडले होते वडिलांचे घर

सरिता मौर्या असे या तरुणीचे नाव असून तिने चार वर्षांपूर्वीच वडिलांचे घर सोडले होते. आरोपी नंदन आणि सरिता या दोघांची मैत्री 2018 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून झाली होती.

नंतर दोघांनी वाराणसीमध्ये भाड्याने घर घेतले होते. तेथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना नंदनला सरिताच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. सरिता अन्य कुणाशी तरी संबंध ठेवून असल्याचा संशय त्यांनी घेतला आणि त्याच रागातून त्याने सरिताला संपवण्याचा कट रचला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.