VIDEO | ‘लोकपत्र’च्या संपादकांवर कार्यालयात हल्ला, आक्षेपार्ह लिखाणावरुन राणेंच्या कार्यकर्त्यांचा संताप
'लोकपत्र' वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्याविषयी वर्तमानपत्रात लेख लिहिला होता (Lokpatra Newspaper Editor attacked )
औरंगाबाद : ‘लोकपत्र’ वृत्तपत्राचे (Lokapatra) संपादक रवींद्र तहकीक (Ravindra Tahkik) यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या रागातून राणेंच्या कार्यकर्त्यांनी संपादक रवींद्र तहकीक यांच्या चेहऱ्याला काळं फासल्याची माहिती आहे. औरंगाबादमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. (Lokpatra Newspaper Editor Ravindra Tahkik attacked by Narayan Rane supporters)
नारायण राणे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील वादावर लेख
‘लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्याविषयी वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. नारायण राणे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील वादावर हा लेख लिहिला होता. राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांचा फोटो लेखाला लावण्यात आला आहे. राणे यांच्याबाबत लेखात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर राणे यांच्या संतप्त समर्थकांनी हल्ला केल्याची माहिती आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल, नारायण राणेंचा शहाजोग सल्ला
‘कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले?’, नारायण राणेंचा सवाल
(Lokpatra Newspaper Editor Ravindra Tahkik attacked by Narayan Rane supporters)