Viral News : 9 वर्षापूर्वी चोरले होते श्रीकृष्णाचे दागिणे, नंतर असं काय घडलं की परत ठेवून गेला
एका चोरानं भगवान श्री कृष्णाचे दागिने चोरले आणि काही काळानंतर ते परत मंदिरात आणून ठेवलेत. चला तर मग या चोरानं असं का केलं? याबाबत जाणून घ्या. या पठ्ठ्याने तब्बल 9 वर्षाांनी दागिने परत केलेत.
नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. अनेक लोकांचे दागिने, गाडी, मौल्यवान वस्तू, पैसे चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडताना दिसतातच. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की, चोरानं चोरी करून परत त्या चोरी केलेल्या वस्तू आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवल्यात. हे ऐकून तुम्ही चकीत झालाच असाल, पण होय हे खरं आहे. एका चोरानं भगवान श्री कृष्णाचे दागिने चोरले आणि काही काळानंतर ते परत मंदिरात आणून ठेवलेत. चला तर मग या चोरानं असं का केलं? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
ओडीसामधील गोपीनाथपुर येथील गोपीनाथ मंदिरातून भगवान श्री कृष्णाचे दागिने चोरीला गेले होते. पण 9 वर्षांनंतर चोरी केलेल्या चोरानं ते दागिने मंदिरात पुन्हा नेऊन ठेवले. फक्त एवढंच नाही तर त्या चोरानं परत केलेल्या दागिन्यांसोबत एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे.
या चिठ्ठीत चोरानं लिहिलं आहे की, त्याला चोरी केल्यानंतर अनेक वाईट स्वप्न पडत होती. इंडिया टुडेमध्ये छापलेल्या एका वृत्तानुसार, चोराला नऊ वर्षांनंतर भगवद्गीता वाचल्यानंतर त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला होता.
चोरानं जी चिठ्ठी सोडली होती त्यात त्यानं लिहिलं होतं की, 2014 मध्ये त्याने एका यज्ञ शाळेतून दागिने चोरले होते. त्यानंतर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे चोराने मंदिरासमोर दागिन्यांची बॅग आणून सोडली. सोबतच त्याने दागिन्यांसोबत प्रायश्चित्त म्हणून 300 रूपये सुद्धा ठेवले होते.
पुढे त्यानं चिठ्ठीत म्हटलं की, भगवान श्रीकृष्ण यांनी दिलेल्या शिक्षेनंतर त्याला पश्चाताप झाला म्हणून त्यानं चोरी केलेले दागिने परत करण्याचा निर्णय घेतला. तसंच चोरानं भगवान श्रीकृष्ण यांचे दागिने परत आणून दिल्यानंतर मंदिरातील पुजारी आणि भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.