अमरावतीची बेपत्ता युवती पश्चिम महाराष्ट्रात या शहरात सापडली

अमरावतीच्या पोलीसांनी काल रात्रीपासून मुलीचा तपास सुरु केला होता. ठिकठिकाणी नाकाबांदी करत पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते.  मुलीला साताऱ्यातून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हानून पाडला आहे.

अमरावतीची बेपत्ता युवती पश्चिम महाराष्ट्रात या शहरात सापडली
मृत्यूनंतर 18 महिने केले नाही अंत्यसंस्कारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 12:16 AM

अमरावती : अमरावतीमधील( Amravati )  बेपत्ता मुलगी अखेर सापडली आहे. सहा तासांच्या शोधानंतर ही मुलगी सापडली आहे. बेपत्ता मुलगी सध्या सातारा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्ररणावरुन अमरावतीत आज चांगलाच राडा झाला होता.

अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा यांनी हा आरोप करत पोलिसांना धारेवर धरले होते. ही मुलगी काल संध्याकाळपासून गायब आहे. मुलीचा भाऊ खासदार राणा यांच्याकडे बुधवारी सकाळी मदत मागण्यासाठी आला होता.

बुधवारी सकाळी खा. नवनीत राणा यांनी राजपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना फोन केला. सदर प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. लव्ह जिहाद  प्रकरणातून अशा मुलीचं अपहरण करून धर्मांतर केलं जातंय, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय.

अमरावतीच्या पोलीसांनी काल रात्रीपासून मुलीचा तपास सुरु केला होता. ठिकठिकाणी नाकाबांदी करत पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते.  मुलीला साताऱ्यातून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हानून पाडला आहे.

मुलगी सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे, आमचे कार्यकर्ते तिथे पोहोचतायत असे शिवराय कुलकर्णी यांनी सांगीतले. मुलगी सुरक्षित आहे. कुटुंबीयांना कुणी समोर आणू नये. ही राजकारण करण्याचा वेळ नाही. मुलीची आयडेंटीटी समोर आणू नये अशी विनंती शिवराय कुलकर्णी यांनी केलेय. तसेच त्यांनी अमरावतीच्या पोलिसांचं अभिनंदन देखील केले आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.