लव्ह जिहादचे कनेक्शन लातूर? खोलीत सापडलेल्या फोन नंबरवरून उघडले रहस्य
त्या तरुणाने अत्यंत हुशारीने त्या मुलीला गंडा घातला. गोरखपूर येथे जाऊन तो त्या मुलीला घेऊन महाराष्ट्रात लातूर येथे आला. इकडे घरातून मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली.

लातूर : गोरखपूरमध्ये राहणाऱ्या एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकबर एका तरुणासोबत मैत्री झाली. तो तरुण पूर्वी गोरखपूर येथेच रहात होता. त्यामुळे त्यांच्यात संभाषण सुरु झाले. त्याच्या गोड बोलण्याला ती भुलली, त्याच्या प्रेमात पडली. त्या तरुणाने अत्यंत हुशारीने त्या मुलीला गंडा घातला. गोरखपूर येथे जाऊन तो त्या मुलीला घेऊन महाराष्ट्रात लातूर येथे आला. इकडे घरातून मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली. अखेर, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेला दोन वर्ष होऊन गेली. पण, पोलिसांनी त्या मुलीच्या घरात मिळालेल्या दोन फोन नंबरवरून लातूरला पोहोचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे का याचा पोलीस तपास सुरु आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून 11 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. काही काळाने त्यांचे अफेअर झाले. त्या तरुणाने याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीस सोबत घेऊन महाराष्ट्रातील लातूर येथे आला. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. यादरम्यान मुलीच्या खोलीतून एका कागदावर लिहिलेले दोन फोन नंबर सापडले.




मुलीच्या कुटुंबीयांनी त्या नंबरवर कॉल केला. त्यावेळी पलीकडून त्या तरुणाने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्याने आपले नाव शेख असे सांगितले. आपण हैदराबाद येथून बोलत असून तुमची मुलगी माझ्यासोबत आहे. ती परत येणार नाही. तसेच, त्याने मुलीच्या वडिलांना धमकावत मुलीला विसरून जा. अन्यथा परिणाम खूप वाईट होतील अशी धमकी दिली.
आरोपीच्या या धमकीमुळे मुलीचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी 24 डिसेंबर 2021 रोजी पोलिस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान त्या युवकाचे ठिकाण महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तरुणाने तो नंबर बंद करून ठेवला होता.
दोन वर्षे पोलीस त्या तरुणाचा शोध घेत होते. पण मुलीचा आणि त्या तरुणाचा काहीच पत्ता लागत नव्हता. पण, 29 मे रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर पोलिसांनी दस्तगीर शेख याला लातूरच्या बदुरे गावातून अटक केली.
पोलिसांनी त्या तरुणाच्या तावडीतून मुलीचीही सुटका केली. शेखने दोन वर्षांपासून आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली. सदर आरोपीविरोधात पोक्सो आणि बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला गोरखपूरला आणले आहे. दरम्यान हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे का? याचाही पोलीस तपास करत आहेत.