प्रेयसी वारंवार लग्नासाठी तगादा लावत होती, मग प्रियकराने पिच्छा सोडवण्यासाठी केला ‘हा’ उपाय

महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात महिलेचे फोटो पाठवले. यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात एका महिलेची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.

प्रेयसी वारंवार लग्नासाठी तगादा लावत होती, मग प्रियकराने पिच्छा सोडवण्यासाठी केला 'हा' उपाय
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 4:03 PM

नवी मुंबई : तीन दिवसापूर्वी नवी मुंबईत सापडलेल्या महिलेच्या हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या लिव्ह इन पार्टनरनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजकुमार बाबुराम पाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेयसी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने आरोपीने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नवी मुंबईत 12 फेब्रुवारी रोजी झुडुपात गळा आवळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद करत प्रकरणाचा तपास सुरु केला असता सर्व प्रकार उघडकीस आला.

‘असा’ लागला हत्याकांडाचा छडा

महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात महिलेचे फोटो पाठवले. यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात एका महिलेची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी महिलेची माहिती तपासली असता सदर तक्रारीतील महिला ही मयत महिलाच असल्याचे कळले. तक्रारीत नमूद माहितीच्या आधारे पोलिसांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधला.

हे सुद्धा वाचा

महिलेचा मोबाईल तपासला असता प्रेमसंबंधाची माहिती मिळाली

सदर महिला क्लीनर म्हणून काम करत असल्याचे कळले. पोलिसांनी महिलेचा मोबाईल तपासला असता महिलेचे तिचे राजकुमार नामक इसमाशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. राजकुमार सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो.

पोलिसांकडून आरोपीला अटक

पोलिसांनी राजकुमारला अटक केली. महिला लग्नासाठी दबाव टाकत होती, यामुळे तिच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी तिची गळा आवळून हत्या केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.