आधी तिच्या पतीला संपवलं, नंतर प्रेयसीलाही मारलं ! वचन देऊनही काढला काटा, त्याने असं का केलं ?
प्रेयसी सतत पैशाची मागणी करत असल्याने वैतगालेल्या प्रियकराने तिचाच काटा काढल्याचे समोर आले आहे. यापूर्वी त्याने प्रेयसीच्याच नवऱ्यालाही संपवलं होतं.
लखनऊ : प्रेमात माणसं आंधळी होतात हे खरं आहे. पण हेच प्रेम पायात काट्यासारखं रुतू लागलं तर काही जण ते सरळ उखडून फेकून देतात. याचंच एक उदाहरण उत्तर प्रदेशमध्ये घडलं आहे. तेथे एका युवकाने त्याच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या (murder news) केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आणि अवघ्या 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळून खुनाचा (crime) उलगडा केला.
उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी व मृत महिलेचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. या संबंधात महिलेचा पती अडसर ठरल्यावर आरोपीने त्याच महिलेसह तिच्या पतीचाही खून केला होता. याप्रकरणी आरोपी दोन वर्ष तुरूंगातही होता, नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता.
मात्र त्या महिलेची पैशांची मागणी सातत्याने वाढत होती. यामुळेच त्रस्त होऊन तिला संपवले, असे आरोपीने पोलिस चौकशीत कबूल केले. या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कोंच कोतवालीच्या गांधीनगर बक्षेश्वर मंदिराजवळील मार्गावर झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. महिलेच्या गळ्यावर वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. गळ्यावर धारदार शस्त्राचे वळही होते.
स्थानिकांच्या मदतीने मृत महिलेची ओळख पटवण्यात आली. रोशनी असे मृत महिलेचे नाव असून तिच्या पतीची काही वर्षांपूर्वीच हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सर्व धागेदोर तपासले असता रोशनीचा प्रियकर सोनू याच्यावर त्यांना संशय आला. पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या 24 तासांत या ब्लाइंड मर्डर केसचा उलगडा करत आरोपीला अटक केली.
आधी केली तिच्या पतीची हत्या
2 जून 2021 रोजी रोशनी हिने प्रियकरासोबत राहण्यासाठी तिच्या पतीची हत्या केली होती. यामध्ये सोनू व आणखी एका इसमाचीही मदत घेतली होती. त्यासाठी ते तुरूंगात होते. काही दिवसांपूर्वी जामीन मिळाल्याने आरोपी बाहेर आले होते. 17 जुलै रोजी रोशनी तिच्या वडिलांसोबत मुलांसह कोंच शहरात आली होती. सोनूला याची माहिती मिळताच तोही तेथे पोहोचला आणि त्याने रोशनीला बाईकवर सोबत नेले. सुनसान जागी जाऊन त्याने रोशनीचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला.
रोशनी सतत पैशांची मागणी करत असे. काही दिवसांपूर्वीच ती पैसे घेऊन गेली होती, मात्र तरीही तिची हाव संपत नव्हती, तसेच तिचे दुसऱ्या व्यक्तीशीही संबंध असल्याचा संशय सोनूला आला होता. याच रागातून तिची हत्या केल्याचे सोनूने चौकशीत कबूल केले.