घरचे लग्नाला नाही म्हणाले… प्रेमीयुगल गोव्यात गेले… नंतर जे काही घडलं ते ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला…

घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या आठवड्यात ते रेल्वेने नाशिकहून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी लग्न न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता.

घरचे लग्नाला नाही म्हणाले... प्रेमीयुगल गोव्यात गेले... नंतर जे काही घडलं ते ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 8:49 PM

नाशिक : प्रेमासाठी जान भी कुर्बान हे असं म्हणणारे आणि तसं वागणारे प्रेमी काही कामी नाहीत. याच वाक्याचा प्रत्यय नाशिक शहराला आला आहे. नाशिकमधील प्रेमीयुगल हे घरच्यांनी लग्नाला प्रखर विरोध गेल्याने पळून गेले होते. त्यांनी थेट गोवा गाठल्याचे समोर आले आहे. गोव्यात जाऊन लग्न करण्याचा निर्धार दोघांनी केला होता. मात्र गोव्यात गेल्यावर दोघांनी निर्णय बदलला. एका हॉटेलात रूम बूक केला त्यासाठी त्यांनी बनावट ओळखपत्र दिल्याची बाबही समोर आली आहे. त्यांनंतर प्रेमीयुगालांनी थेट आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात दोघांनी विषप्राशन केले होते त्यात मुलाचा मृत्यू झाला असून मुलीची प्रकृती स्थिर आहे. गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून गोव्याचे पोलीस तपास करीत आहे. यामध्ये मृत्यू झालेला तरुण हा 21 वर्षांचा होता तर 22 वर्षांची तरुणी असून तिच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर नाशिकमधील प्रेमी युगलांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला असून याबाबत कल्पना दिली आहे.

नाशिक पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली असून मुलाचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय मुलीचे नातेवाईक देखील मुलीवर ज्या रुग्णालयात दाखल आहे तिथे पोहचले आहेत. कोलवा पोलीसांनी याबाबत याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक येथील गौरव यादव या 21 वर्षीय तरुणाचे एका 22 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांनी कडाडून विरोध केला होता.

घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या आठवड्यात ते रेल्वेने नाशिकहून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी लग्न न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता.

मुलाच्या मृत्यूनंतर तरुणीने गोव्यातील कोलवा पोलिसांना जबाबात ही माहिती दिली असून कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा हे तपास करीत आहे.

या दोघांनी आपले नाव बदलत गोव्यातील हॉटेलमध्ये राहत होते. तरुणाने किशोर अय्यर या बनावट नावाने दक्षिण गोव्यातील कोलवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी पुरावा म्हणून कागदपत्रे दिले आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.