जेव्हा काँग्रेस आमदाराची पत्नी पत्र लिहून सोनिया गांधीकडेच पतीची तक्रार करते!
काँग्रेस आमदाराच्या पत्नीचे पतीवर सनसनाटी आरोप! कोण आहे तो चर्चेत आलेला आमदार?
मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. एका काँग्रेस आमदाराच्या पत्नीने पतीवर सनसनाटी आरोप केलेत. धक्कादायक बाब म्हणजे थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहून गंभीर आरोप काँग्रेस आमदाराच्या पत्नीने पतीवर केलेत. मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार उमंग सिंघार हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलंय. आधी बलात्काराचा गंभीर आरोप आणि त्यानंतर आता खुद्द त्यांच्या पत्नीनं पत्र लिहून आरोप केल्यानं चर्चांना उधाण आलंय.
काय आरोप?
आपल्या पतीने अनेक महिलांशी संबंध ठेवले असल्याचं काँग्रेस आमदाराच्या पत्नीने म्हटलंय. इतकंच नाही तर या संबंधांदरम्यान, ते व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि नंतर या व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करुन महिलांना त्रास देत असल्याचंही पीडित पत्नीने म्हटलंय. आपल्यासोबत असाच प्रकार केल्याचं काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्या पत्नीने म्हटलंय.
सनसनाटी आरोप करणारं हे पत्र काँग्रेस आमदाराच्या पत्नी सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना देखील पाठवलंय. या पत्राने सध्या काँग्रेसच्या गोटातील राजकारण ढवळून निघालंय.
इंदूर येथील गोंडवानी विधानसभा मतदार संघातून उमंग सिंघार हे आमदार आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांचं नाव वादात आलं होतं. एका महिलेनं उमंग सिंघार यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानं चर्चांना उधाण आलंय.
अनेक महिलांसोबत आपल्या पतीने संबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेलिंक केल्याचा आरोप सिंघार यांच्या पत्नीने केलाय. उमंग सिंघार लैंगिक संबंध ठेवून त्या दरम्यान महिलांसोबत व्हिडीओही रेकॉर्ड करतात. या व्हिडीओची भीती घालून ते महिलांना ब्लॅकमेल करतात, असा आरोप करण्यात आलाय. आपल्यासोबतही त्यांनी असाच प्रकार केल्याचा आरोप सिंघार यांच्या पत्नीनं केलाय.
‘आता तर हद्द झाली..’
सिंघार यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या सगळ्या कारनाम्यांबाबत उघडपणे नमूद केलंय. सगळं माहीत असूनही मी सहन केलं, असंही त्यांनी म्हटलंय. पण आता सगळ्याची हद्द झाली आहे, माझी सहनशक्ती संपली आहे, असं म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडलीय.