घटस्फोट न देता पुन्हा लग्न करणं शक्य आहे काय?, गूगलवर केलं सर्च; त्यानंतर जे घडलं…
रतलाममधील राकेशने आपल्या पत्नी बुलबुलची गळा दाबून हत्या केली. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला. बुलबुल राकेशच्या वर्तनावर शंका घेत होती. हत्येनंतर राकेशने गुगळवर "दुसरं लग्न", "खूनाचे पुरावे लपवणे" आदी शोधले. या शोध इतिहासाच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला.
मध्यप्रदेशातील रतलाममध्ये एका राकेश नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी बुलबुल हिची गळा दाबून हत्या केली आहे. घरगुती कारणावरून त्याने पत्नीची हत्या केली. बुलबुल त्याच्या चारित्र्यावर संशय घेत होती. तसेच त्याला पार्टीत जाण्यापासून मना करत होती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार झगडा होत होता. त्यामुळेच वैतागलेल्या राकेशने तिची हत्या करून तिचा कायमचा काटा काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गूगलवर सर्च
पत्नीच्या हत्येनंतर राकेशने गूगलवर दुसरं लग्न करण्याचा कायदेशीर मार्ग काय आहे हे सर्च केलं. तसेच खूनाचे पुरावे, तसेच नखाची निशाणी कशी लपवायची याची आणि पोस्टमार्टच्या प्रक्रियेबाबतची माहितीही गूगलवर सर्च केली. त्याने केलेल्या गूगल सर्च हिस्ट्रीच्या आधारेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
कुठला रहिवाशी?
राकेश हा बिलपांक पोलीस ठाणे परिसरातील संदला गावचा रहिवाशी होता. काही वर्षापूर्वीच त्याचं बुलबुल सोबत लग्न झालं होतं. राकेश शेती करायचा. तर बुलबुल घर सांभाळायची. राकेश आणि बुलबुलमध्ये नेहमी झगडा होत होता. बुलबुल ही राकेशच्या चारित्र्यावर संशय घ्यायची. त्याला कोणताही घरगुती समारंभाला जाण्यास मज्जाव करायची. राकेशला तिची ही गोष्ट नेहमी खटकायची.
गळा दाबून मारलं
15 डिसेंबर रोजी बुलबुलच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. 16 डिसेंबर रोजी शवविच्छेदनाचा अहवाल आला. त्यात तिची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी पोलिसांनी राकेशला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या गूगलची सर्च हिस्ट्री तपासली, त्यानंतर मात्र, तो गर्भगळीत झाला. त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने गुन्हा कबूल करताच पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आणि त्याला कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. बुलबुलचा पोस्टमार्टम अहवाल आला. त्यात तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालं होतं. त्याचवेळी आमचा राकेशवर संशय बळावला होता. त्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवला. पण तो बधत नव्हता. जेव्हा त्याचा मोबाईल तपासला तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.