रात्रीच्या अंधारात आरोपीलाच पती समजली, नवऱ्याशेजारी झोपलेल्या विवाहितेवर घरात बलात्कार

घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपी आत शिरला आणि रात्रीच्या अंधारात त्याने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली. (Married Woman Raped mistaken Husband)

रात्रीच्या अंधारात आरोपीलाच पती समजली, नवऱ्याशेजारी झोपलेल्या विवाहितेवर घरात बलात्कार
मध्य प्रदेशात महिलेवर बलात्कार
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 12:30 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात विवाहितेवर घरात घुसून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे घटना घडली, त्यावेळी महिला पती आणि मुलांसोबत घरात झोपली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी घरात शिरला, आणि महिला त्याला पती समजल्यामुळे भलताच प्रकार घडला. महिलेला आपली चूक समजताच तिने आरडाओरड केली, त्यावेळी आरोपी पसार झाला. (Madhya Pradesh Crime Married Woman Raped as she mistaken accuse as Husband)

मध्य प्रदेशात रिवा जिल्ह्यातील मऊगंजमध्ये ही घटना घडली. पीडित महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत घरात झोपली होती. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपी आत शिरला. रात्रीच्या अंधारात त्याने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली.

लैंगिक संबंध ठेवणारा पती असल्याचा समज

आपल्याशी लैंगिक संबंध ठेवणारा आपला पतीच आहे, असा महिलेचा गैरसमज झाला. रात्रीच्या अंधारात महिला चुकून आरोपीला आपला पतीच समजली. मात्र काही वेळात तिला तो पती नसल्याची जाणीव झाली. त्यासरशी तिने जोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. महिलेच्या किंकाळ्या ऐकून पती आणि मुलांना जाग आली.

गैरसमज दूर होताच आरडाओरड

महिलेच्या पतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्याला धक्का दिला. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. नवऱ्याने बाहेर जाऊन त्याचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अंधारात आरोपी कुठे पसार झाला, हे समजलंही नाही. महिलेच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

दुसऱ्या दिवशी पीडित विवाहिता पतीसोबत पोलिसात गेली. रात्रीच्या वेळेस घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे अज्ञात आरोपी घरात शिरला आणि त्याने अंधाराचा गैरफायदा घेत आपल्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप महिलेने केला. पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पथकं रवाना झाली आहेत.

संबंधित बातम्या :

बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक

फेसबुकवर प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, 25 मित्रांकडून गँगरेप

(Madhya Pradesh Crime Married Woman Raped as she mistaken accuse as Husband)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.