मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात एका पतीने दोन लग्न केली. पहिली पत्नी पळून गेली म्हणून दुसरं लग्न केलेल्या या पतीचा जीव पुन्हा पहिल्या पत्नीवर आला. त्यासाठी दुसऱ्या पत्नीचाी हत्या करण्याचा विषारी कट आखण्यात आला होता. सर्पदंशाने दुसऱ्या पत्नीला मारहाण्याचा घाट पतीने घातला होता. पण सुदैवानं यातून पत्नी अगदी थोडक्यात बचावली. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या मंदसौर इथं उघडकीस आली आहे. पहिलीच्या चक्करमध्ये दुसरीला संपवण्याचा पतीने रचलेला हा कांड आता समोर आला आलाय. याप्रकरणी पतीला अटक देखील करण्यात आलीय.
दुसऱ्या पत्नीची हत्या करण्यासाठी पतीने मित्राच्या मदतीने साप आणला. पत्नीला सर्पदंशाने मारण्याचा कट त्याने आखला होता. त्यानंतर त्याने पत्नीला विषारी इंजेक्शनही दिले.
सुदैवाची बाब म्हणजे शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीने स्वतःचा जीव वाचवलाय. गेल्या सहा महिन्यांपासून पीडित पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी इंजेक्शनमुळे महिलेची प्रकृती नाजूक आहे. जर तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली नाही, तर ज्या ठिकाणी पायावर सर्पदंश झाला आहे, तो पाय कापावा लागू शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलंय.
आरोपी पती हा तस्करीच्या गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्यावेळी त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली. त्यामुळे आरोपीने बाहेर आल्यानंतर दुसरं लग्न केलं.
दुसऱ्या लग्नापासून त्याला एक मुलगाही झाला. पण नंतर अचानक पहिली बायको पुन्हा त्याच्या संपर्कात आली. दोघांच्या लपून गाठीभेटी होण्याचे प्रकार वाढले. ही बाब दुसऱ्या बायकोला कळल्यानंतर त्यांच्यात खटके उडाले. भांडण वाढत गेलं.
या भांडणातून पती दुसऱ्या पत्नीला मारहाण करणं, तिला छळणं, असे प्रकार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. नंतर एक दिवस त्याने चक्क तिचा जीव घेण्यासाठी हत्येचा विषारी कट रचला. पत्नीला साप चावला तर ती मरेल, या विचाराने तो मित्राच्या मदतीने विषारी सापाला घेऊन आला. पत्नीला सर्पदंश केला. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला पुन्हा विषारी इंजेक्शनही दिलं. शिवाय मारहाणही केली.
हे विषारी कांड करणाऱ्या आरोपी पतीचं नाव मोजिम अजमेरी असं आहे. तर पीडित पत्नीचं नाव हलीमा असं आहे. हलीमा या घटने अगदी थोडक्यात बचावली. हलीमा बेशुद्ध झाल्याचं पाहून मोजिम आणि त्याचा मित्र घरातून गेले. त्यानंतर शुद्धीवर येताच हलीमा शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात पोहोचली.
मे महिन्यात घडलेल्या या प्रकारानंतर आजही हलीमावर उपचार सुरु आहे. या धक्कादायक प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. शिवाय त्याच्या साथीदारांनीही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.