‘हे देवा, मला माफ कर, मी तुझ्या देवळात….’ मध्य प्रदेशातील चोराची चिट्ठी चर्चेत

देवळात चोरी केल्यानंतर चोरासोबत नेमकं काय घडलं? चोरानं चिट्ठीत लिहिलेला मजकूर वाचून सगळेच चकीत

'हे देवा, मला माफ कर, मी तुझ्या देवळात....' मध्य प्रदेशातील चोराची चिट्ठी चर्चेत
चोरीपेक्षा चोराच्या चिट्ठीचीच चर्चा जास्तImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 2:39 PM

मध्य प्रदेश : चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. एका चोराने (Temple Thief) मंदिरातील मौल्यवान सामानाची चोरी केली. पण चोरीच्या काही दिवसांनी चोराने स्वतःच चोरीचं (Madhya Pradesh Crime News) सगळं सामान पुन्हा मंदिरात परत केलं आहे. इतकंच नव्हे तर एक चिट्ठीही चोराने लिहिली. या चिट्ठीत (Letter of Theft) त्याने चोरलेलं सगळं सामान परत का केलं, याचं कारणही लिहिलंय.

मध्य प्रदेशच्या बालाघाट इथं असलेल्या एका जैन मंदिरात चोरीची घटना घडली होती. 24 ऑक्टोबर रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली. या चोरीप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. जैन मंदिरातील चोरीप्रकरणाचा तपास सुरु होता. पण चोराला अटक करण्याआधी खुद्द चोरानेच सगळं चोरी केलेलं सामानं परत आणून दिलंय.

चोरीच्या सामानासोबत चोराने एक चिट्ठी लिहिली होती. ही चिट्ठी आता चर्चेत आली आहे. जैन मंदिरात चोरी केल्यामुळे मला फार भोगावं लागलं, असं चोराने चिट्ठीमध्ये म्हटलंय. चोरी केल्याबाबत, ‘देवा मला माफ कर, मी चोरीचं सामान आता परत करतो आहे’, असंही त्याने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

‘सगळं चोरीचं सामान मी ठेवून जातो आहे. ज्याला हे सामान सापडेल, त्याने जैन मंदिरात द्यावं’, अशी विनंतीही त्याने चिट्ठी लिहून केली होती. ही चिट्ठी लिहिणारा आणि चोरीचं सामान परत आणणार कोण होता, हे मात्र कळू शकलेलं नाही.

चोरी केलेलं देवळातील सामान चोराला परत का आणून द्यावंसं वाटलं आणि त्याचं मनपरिवर्तन नेमकं कशामुळे झाले, यावरुन चर्चांना उधाण आलंय. एका कुटुंबाला मंदिराचा बाहेर एक बॅग आढळली होती. ज्यात चोरी केलेलं सामान आणि चोराने लिहिलेली ही अजब चिट्ठी आढळलीय.

दरम्यान, चोरीचं सामान पुन्हा मंदिराच्या आवारत सापडल्यामुळे मंदिर प्रशासनाच्या लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनाही याप्रकरणी माहिती देण्यात आली आहे. चोरी झालेलं सामान आणि परत चोराने केलेल्या बाबी या सगळ्याची तपासणी आता केली जाते आहे. यात कोणती गोष्ट पुन्हा गहाळ तर झालेली नाही ना, याचाही तपास पोलीस करत आहेत.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.