भाऊजींचं उडवलेलं डोकं घेऊन मेहुणा पोलिस स्टेशनात, बहिणीचीही आत्महत्या

आरोपी धीरज शुक्ला आणि मयत ब्रिजेश बर्मन हे चांगले मित्र होते, मात्र ब्रिजेशने आपल्या बहिणीशी पळून लग्न केल्याचा राग धीरजच्या मनात होता (Madhya Pradesh man kills Brother in law)

भाऊजींचं उडवलेलं डोकं घेऊन मेहुणा पोलिस स्टेशनात, बहिणीचीही आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 2:01 PM

भोपाळ : मेहुण्यानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे. भाऊजींचं डोकं उडवून मेहुणा पोलिस स्टेशनात दाखल झाला. आपल्या पतीची हत्या झाल्याचं समजल्यानंतर बहिणीनेही आयुष्य संपवलं. बहिणीने पळून जाऊन केलेलं लग्न मान्य नसल्यानेच त्याने ही हत्या केल्याचा आरोप आहे. (Madhya Pradesh man brutally kills Brother in law Sister commits Suicide)

बहिणीच्या नवऱ्याचं डोकं उडवलं

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तिलवारा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. पोलीस कर्मचारी गुरुवारी कामात व्यस्त असताना आरोपी धीरज शुक्ला कापलेलं मुंडकं घेऊन दाखल झाला. हे दृश्यं पाहून सर्वांचा थरकाप उडाला. ब्रिजेश बर्मन नावाच्या तरुणाची आपण हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. ब्रिजेश हा आपल्या बहिणीचा नवरा आहे. त्याचा मृतदेह रामनगर भागातील शेतात पडला आहे, असंही त्याने सांगितलं.

आरोपी मेहुण्याला बेड्या

पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं आणि घटनास्थळी धाव घेतली. तिथे ब्रिजेश बर्मनचा मृतदेह सापडला. मृतदेह चित्रविचित्र अवस्थेत होता. मुंडक्यासोबतच त्याचे हातही कुऱ्हाडीने कापलेले होते. पोलिसांनी ब्रिजेश बर्मनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी धीरज शुक्लाला बेड्या ठोकल्या.

आरोपी आणि मयत यांची मैत्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी धीरज शुक्ला आणि मयत ब्रिजेश बर्मन हे चांगले मित्र होते. दोघांचा मद्यविक्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी ब्रिजेशने धीरजची बहीण पूजाशी पळून जाऊन लग्न केलं. मित्राने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना धीरजच्या मनात कुढत होती. सूड उगवण्याच्या हेतूने तो ब्रिजेशच्या मागावर होता.

तो दिवस अखेरचा ठरला

लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पूजा पती ब्रिजेशसोबत पहिल्यांदा माहेरी आली. मात्र तो दिवस दोघांच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. कारण धीरजने आपल्या भाऊजींची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पूजानेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं. दरम्यान, पोलिसांना पूजाचा मृत्यूही संशयास्पद वाटत आहे. तिने आत्महत्या केली, की तिच्यासोबत घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या

माहेरकडून जमीन मिळाली, तरीही वाद, मुलीने आईला दगडावर आपटून मारलं!

(Madhya Pradesh man brutally kills Brother in law Sister commits Suicide)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.