महिन्याभरापूर्वीच लागली होती नोकरी, त्या दिवशी कामावरून परत आलीच नाही; शोधल्यावर जे सत्य समोर आलं, कुटुंबिय हादरलेच
महिन्याभरापूर्वी तिला जॉब मिळाला होता, घटनेच्या दिवशीदेखील ती कामाला गेली पण रात्री उशीरापर्यंत घरी परतली नाही. खूप शोधाशोध केल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली .
भोपाळ | 21 सप्टेंबर 2023 : प्रेमात काही माणसं भल्याबुऱ्याची चाड विसरतात, असं म्हणतात. प्रेमाचं भूत डोक्यावर एवढं स्वार होतं की त्यासाठी ते काहीही करून बसतात. पण तेच प्रेम जर त्यांच्यापासून दूर जात असेल तर ? ते मिळवण्यासाठीदेखील ते काहीही करायला तयार असता, परिणामांचीही पर्वा करत नाहीत. अशाच एका प्रेमापायी गुन्हा घडल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. तेथे एका इसमाने त्याचं जिच्यावर प्रेम होतं तिचीच हत्या केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील पन्ना येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. तिथे प्रियकराने त्याच्याच प्रेयसीवर चाकूने वार करून तिचा जीव (murder news) घेतला. तिने लग्नासाठी नकार दिल्याने त्याने हे क्रूर पाऊल (crime news) उचलल्याचे समजते.
खरंतर त्या तरूणाला त्वचेशी संबंधित काही आजार झाला होता, ज्यानंतर त्या तरूणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडून लग्नास नकार दिला. यामुळेच तो तरूण संतापला आणि बदला घेण्यासाठी त्या तरूणीची निर्घृण हत्या केली.
महिन्याभरापूर्वीच लागली होती नोकरी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणीला महिन्याभरापूर्वीच नोकरी लागली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती शिक्षिका म्हणून जॉईन झाली. 13 सप्टेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे कामावर गेली मात्र परत आलीच नाही. रात्री बराच उशीर होऊनही ती घरी न आल्याने कुटुंबियांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण तिचा काहीच पत्त लागला नाही. त्यांनी शाळेत जाउऊनही विचारपूस केली असता, ती 13 तारखेला शाळेत आलीच नसल्याचे त्यांना समजले आणि त्यांच्या चिंतेत भर पडली. अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत, तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. अखेर, तीन दिवसांनी पन्ना-कटनी रोड येथील निर्माणाधीन टोल प्लाझाजवळ असेलल्या जंगलात त्यांना बेपत्ता तरूणीचा मृतदेह सापडला. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबियांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. नंतर त्या तरूणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
आरोपीला केली अटक
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले, मृत तरूणीचे गावातील एका तरूणाशी प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्या तरूणाला त्वचेशी संबंधित आजार झाला. त्या तरूणीला याबद्दल कळल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं, एवढचं नव्हे तर तिने त्याच्याशी लग्न करण्यास थेट नकार दिला. पण आरोपी तरूण तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता.
अखेर तिने सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आरोपी संतापला. 13 सप्टेंबर रोजी त्याने तिला भेटण्यास बोलावले, तो तिला बाईकवर बसवून घेऊन गेला आणि चाकूने वार करून तिची हच्या केली. एवढेच नव्हे तर तिचा चेहराही दगडाने ठेचला आणि मृतदेह जंगलात फेकून दिला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.