Nirbhaya Case | प्रायवेट पार्टवर लाठीचा वार, शरीर दाताने चावलं, देशात पुन्हा एकदा निर्भया कांडसारखी हैवानियत

| Updated on: Jul 29, 2023 | 10:04 AM

Nirbhaya Case | देशात पुन्हा एकदा निर्भया कांडसारखी हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी रीवा येथे रेफर करण्यात आलं आहे.

Nirbhaya Case | प्रायवेट पार्टवर लाठीचा वार, शरीर दाताने चावलं, देशात पुन्हा एकदा निर्भया कांडसारखी हैवानियत
madhya pradesh satna minor girl physical assault case
Follow us on

भोपाळ : देशात पुन्हा एकदा निर्भया कांडसारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत निर्भयावर ज्या क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले, तसाच प्रकार मध्यप्रदेशच्या सतनामध्ये घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी रीवा येथे रेफर करण्यात आलं आहे. या प्रकरणावरुन मध्य प्रदेशात राजकारण सुरु झालं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे.

पोलिसांनी चौकशीनंतर दोघांना अटक केली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. मैहर पोलीस अनुविभागीय अधिकारी लोकेश डावर यांनी, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं.

निर्भया कांड सारखं प्रकरण

पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय. तिच्या शरीरावर दाताने चावल्याचे निशाण आहेत. पीडितेच्या प्रायवेट पार्टवर लाठीने प्रहार करण्यात आलाय. मैहरचे SDOP लोकेश डावर यांनी ही माहिती दिली. गुरुवारी दोन आरोपी मुलीला लाडीगोडी लावून टेकडीवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिले?

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टि्वट केलं आहे. “मला मैहर बलात्कार घटनेबद्दल माहिती मिळाली. मला खूप वेदना झाल्या. मी व्यथित आहे. मी पोलिसांना निर्देश दिले आहेत. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रशासनाला मुलीच्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल” असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलय.


कमलनाथ यांचा आरोप

गँगरेपच्या प्रकरणात राजकारण सुद्ध पहायला मिळतय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली. शिवराज सरकार राज्यात महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.


बलात्काराच्या घटनेवरुन राजकारण

“मैहरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. ही खूप निंदनीय घटना आहे. निर्भया कांडप्रमाणे पीडित मुलीवर अमानवीय कृत्य करण्यात आलं. प्रदेशात ही जी घटना घडलीय त्यावरुन शिवराज सरकार महिला आणि मुलींना संरक्षण देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं, हे स्पष्ट होतं” असं कमलनाथ म्हणाले.