माफिया डॉन होता शाहरुख खानचा चाहता, ‘मन्नत’वर चालणार ‘बाबा का बुलडोझर’

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा चाहता असलेल्या माफिया डॉन अतिक अहमद याने आपल्या घराचे नाव 'मन्नत' ठेवले होते. पोलिसांनी 'मन्नत' जप्त केले आहे. त्याची किंमत 3.7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. गँगस्टर कायद्यांतर्गत मन्नतवर जप्ती आणण्यात आली आहे.

माफिया डॉन होता शाहरुख खानचा चाहता, 'मन्नत'वर चालणार 'बाबा का बुलडोझर'
Shahrukh Khan and atik ahmadImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 8:00 PM

नई दिल्ली | 4 फेब्रुवारी 2024 : माफिया डॉन अतिक अहमद याची एकेकाळी दहशत होती. त्याची एक हाक कुणाचीही निद्रानाश करणारी अशीच होती. जमीन बळकावण्यापासून दरोडा, खून आणि खंडणीपर्यंत अशा सगळ्याच गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. पोलिस आणि प्रशासनाला आव्हान देत तो ही सगळी कामे करायचा. पण, त्याच्या हत्येनंतरही त्याचा भूतकाळ त्याची पाठ सोडत नाहीय. अतिक अहमद याने आपल्या मसल पॉवरच्या जोरावर गरिबांच्या ज्या संपत्ती हडप केल्या त्या आता जप्त केल्या जात आहेत. त्यांच्यावर ‘बाबांचा बुलडोझर’ फिरत आहे. यामध्येच आता अतिक अहमद याची मन्नत ही कोठीही आली आहे.

अतिक अहमद हा शारुख खान याचा मोठा चाहता होता. शाहरुख याच्या मन्नत बंगल्याप्रमाणेच अतिक याने एक बंगला सजवला होता. त्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली. त्याचे नावही त्याने आपल्या आवडत्या नायकाच्या बंगल्यानुसार त्याचे नाव मन्नत असे ठेवले.

ग्रेटर नोएडातील सेक्टर 36 येथे हा मन्नत आहे. या घर क्रमांक A 107 ची किंमत सुमारे 3.7 कोटी रुपये आहे. याच मन्नतवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली आहे. त्यावर आता बुलडोझर फिरविण्याची तयारी सुरू आहे. 1994 मध्ये अतिक अहमद याने मुलांच्या शिक्षणासाठी हे घर खरेदी केले होते. परंतु, या घराचा वापर अभ्यासापेक्षा बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कारवायांसाठी अधिक होऊ लागला.

अतिक अहमद याचा तो गुन्हेगारी अड्डा बनला होता. जमिनीशी संबंधित अनेक सौदे याच मन्नतवर अंतिम झाले. उमेश पाल याची गेल्या वर्षी ह्त्या झाली. त्यानंतर अतिक याचा मुलगा असद आणि शूटर गुलाम कानपूरमार्गे ग्रेटर नोएडा येथील मन्नत कोठीत पोहोचले होते. अतीक अहमद याचा बेकायदेशीर मालमत्तेविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये अतिक याच्या ताब्यात असलेल्या १६ बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांनी आपली नजर अतिक याच्या मालमत्तेवर रोखली आहे.

2019 मध्ये अतिक अहमद याने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याने आपली संपत्ती २५ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कागदोपत्री संपत्तीशिवाय 1200 कोटी रुपयांची अवैध संपत्ती असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यापैकी 417 कोटी रुपयांची मालमत्ता सरकारच्या ताब्यात आहे तर 752 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.