तरुणीने ड्रग्ज विक्रीस नकार दिला, नंतर माफियाने काय केले ऐकून धक्काच बसेल
पीडित तरुणी आणि संशयित आरोपी यांची चांगली ओळख झालेली होती, त्यानंतर ते दोघे वारंवार भेटतही होते, मात्र याचवेळी संशयित आरोपीने घरच्यांच्या भेटीचा बहाणा करून तिला घरी नेले होते.
Nashik Crime : नाशिकच्या गुन्हेगारी विश्वातून समोर (Nashik Crime News) आलेली एक धक्कादाक घटना संताप आणणारी आहे. एका ड्रग्ज माफियाने ड्रग्ज विक्री ( Drugs Sale) करण्यासाठी युवतीवर दबाव टाकत पिस्तुलाचा धाक दाखवत अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. इतकेच काय तर ड्रग्स विक्री केले नाही तर तुझे संपूर्ण कुटुंब गोळ्या घालून मारून टाकील अशी धमकीही दिल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान पीडित तरुणीची जात माहिती असल्याने त्याने जातिवाचक शिवीगाळ देखील केली आहे. या संपूर्ण प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अरुण न्याहाळदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिकच्या अंबड पोलीसांनी त्याला तात्काळ अटक केली असून चौकशी सुरू केली आहे.
खरंतर पीडित तरुणी आणि संशयित आरोपी सनी न्याहाळदे यांची पंचवटी परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात ओळख झाली, 2018 मध्ये दोघे वर्गमित्र होते.
पीडित तरुणी आणि संशयित आरोपी यांची चांगली ओळख झालेली होती, त्यानंतर ते दोघे वारंवार भेटतही होते, मात्र याचवेळी संशयित आरोपीने घरच्यांच्या भेटीचा बहाणा करून तिला घरी नेले होते.
यावेळी मात्र संशयित आरोपी सनीच्या घरी कोणीही नव्हते, सनीने घराचा दरवाजा बंद करत पीडित तरुणीवर बलात्कार केला, याशिवाय कुणाला सांगितले तर जीवे मारून टाकील अशी पिस्तूल दाखवत धमकी दिली.
यानंतर पीडित तरुणीला सनी न्याहाळदे याने वेळोवेळी हॉटेलमध्ये आणि कारमध्ये अत्याचार केल्याचे तरुणीने म्हंटले आहे.
सनी हा पूर्वी एका मोबाइल दुकानात कामाला होता, नंतर तो ड्रग्ज विक्री करणाऱ्या एकाच्या संपर्कात आला त्यानंतर सनीने तोच व्यवसाय सुरू केला होता, त्यात तो दिवसाला 5 ते 7 सात हजार रुपये कमावत असल्याची माहीती आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी दररोज 20 ते 25 जणांना ड्रग्ज पुरवत असल्याचीही चर्चा आहे, पोलिस अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने विक्री सुरू असल्याची देखील चर्चा आहे.