महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामिनासाठी धाव

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या ॲपचा मालाक रवी उप्पल याला अटक करण्यात आली. दुबईतील स्थानिक पोलिसांनी ही कारवाई करत रवी उप्पल याला बेड्या ठोकल्या. आता याच प्रकरणात बॉलिवूडमधूनही मोठी बातमी समोर आली आहे.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामिनासाठी धाव
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 10:29 AM

मुंबई | 13 डिसेंबर 2023 : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या ॲपचा मालाक रवी उप्पल याला अटक करण्यात आली. दुबईतील स्थानिक पोलिसांनी ही कारवाई करत रवी उप्पल याला बेड्या ठोकल्या. आता याच प्रकरणात बॉलिवूडमधूनही मोठी बातमी समोर आली आहे.

बॉलिवूडमधील अभिनेता साहिल खान याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. साहिल खान सध्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यात साहिल खान आरोपी आहे. त्याच पार्श्वभूमीवर साहिल खान याने सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

मात्र मुंबई पोलिसांनी त्याच्या अटकपूर्व जामीनाला विरोध दर्शवला आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात जवळपास 15 हजार कोटींची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

एफआयआरमधून आले होते साहिल खानचे नाव

मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी महादेव बुक ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी या 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. यामध्ये 31 जणांविरुद्ध एफआयआर, तर 32 क्रमांक अनोळखी लोकांविरुद्ध होता. या प्रकरणाची एफआयआर प्रत बाहेर आल्याने एक धक्कादायक खुलासा झाला. त्यानुसार या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचेही नाव होते. या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 म्हणून अभिनेता साहिल खानचे नाव असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे अभिनेता साहिल खान याच्यावर महादेव ऑनलाइन ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप होता. साहिल खान याने केवळ प्रमोशनच केले नाही तर त्याने ॲप ऑपरेट करून त्या माध्यमातून प्रचंड नफा मिळवला, असा आरोप लावण्यात आला आहे.

याप्रकरणी माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. यामुळे लोकांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा बनकर यांनी केला आहे.

रवी उप्पल याला अटक

महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून अटक करण्यात आली. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे. रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरु होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पला अटक केली .

महादेव ॲप काय आहे ?

महादेव ॲप सट्टेबाजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इथं ऑनलाईन सट्टेबाजी केली जात होती. या ॲपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण इतर देशांमध्ये हे ॲप अद्यापही सुरु आहे. छत्तीसगडमधील चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल याला दुबईत बसून चालवत होते. या दोघांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.