महादेव ॲप प्रकरणात मोठी कारवाई, डाबर ग्रुपचे चेअरमन आणि डायरेक्टरविरोधात FIR, मॅच फिक्सिंगमध्ये झाले सहभागी ?

महादेव ॲप प्रकरणात तपास यंत्रणा सातत्याने आपला मुसक्या आवळत आहेत. रणबीर कपूरसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आल्याने एकच खळबळ माजली आहे. आता याप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

महादेव ॲप प्रकरणात मोठी कारवाई, डाबर ग्रुपचे चेअरमन आणि डायरेक्टरविरोधात FIR, मॅच फिक्सिंगमध्ये झाले सहभागी ?
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 9:03 AM

मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : महादेव ऑनलाइन ॲप केसमध्ये मोठी कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. या बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचेही नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आल्याचे काल उघड झाले होते. आता याप्रकरणात आणखीही बड्या लोकांची नाव गुंतल्याचेही समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवला आहे. हे दोघेही डाबर ग्रुपचे चेअरमन आणि डायरेक्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी ही कारवाई करण्यात आली.

नुकतेच केंद्र सरकारने महादेव ॲपवर बंदी घातली आहे. हे ॲप आणि त्याच्याशी संबंधित लोक हे ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणी ईडीने छत्तीसगडमधून दोन पोलिसांनाही अटक केली आहे. खरंतर माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गेल्या आठवड्यात दि कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार महादेव बेटिंग ॲपबाबत मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला होता. यामध्ये 31 जणांविरुद्ध एफआयआर आहे, तर 32 क्रमांक अनोळखी लोकांविरुद्ध आहे. एफआयआरच्या कॉपीमध्ये आरोपी नंबर 16 आणि आरोपी नंबर 18 हे मोहित बर्मन आणि गौरव बर्मन आहेत. एफआयआरमध्ये मोहित बर्मनचा पत्ता फोर्ट येथील दाखवण्यात आला आहे, तिथे त्याच्या गुंतवणूक कंपनीचे कार्यालय आहे.

FIR मध्ये मॅच फिक्सिंग रॅकेटचा उल्लेख

हे सुद्धा वाचा

मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी माटुंगा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवली होती. ही एफआयआर खिलाडी ॲपच्या विरोधात दाखल करण्यात आली, ते महादेव बुकचे सपोर्टिंग ॲपदेखील आहे. महादेव ॲप प्लॅटफॉर्मचा किंगपिन सौरभ चंद्राकर याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ मुश्ताकीमशी हातमिळवणी केल्याचे वृत्तसमोर आले होते. सौरभ आणि मुश्ताकीम यांनी मिळून एक गेम ॲप लॉन्च केले. या ‘खेलोयार’मध्ये एक ॲप आहे जे भारत आणि पाकिस्तानमध्ये चालवले जात आहे. मुंबईत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सौरभ चंद्राकर, मुश्ताकीम, रवी उप्पल आणि इतर अनेकांकडून मॅच फिक्सिंग रॅकेट चालवल्याचा उल्लेख आहे.

अस पसरलंय रॅकेट

प्रकाश बनकर यांच्या तक्रारीनुसार, एफआयआरमध्ये आरोपी चंदर अग्रवाल आणि लंडनचे रहिवासी दिनेश खंबाट हे भारतात आयोजित क्रिकेट लीगमधील मॅच फिक्सिंगचे मुख्य सट्टेबाज असल्याचा उल्लेख आहे. आणि हे वेबसाइट्स आणि ॲप्सद्वारे देखील केले जाते. आरोपी अमित शर्मा या त्या दोघांशी निगडीत असून तो त्यांना या प्रक्रियेत मदत करतो. चंदर अग्रवालची लीगमध्ये बॅकडोअर भागीदारी आहे आणि त्याला दुबईतील कनेक्टिंग व्यक्ती हेमंत सूद आणि रोहित कुमार मुरगोई यांनी मदत केली, ्से नमूद करण्यात आले आहे.

डाबर ग्रुपच्या अधिकाऱ्यांचा क्रिकेट टीममध्ये इक्विटी स्टेक

या एफआयआरमध्ये तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रोहित कुमार मुरगोई आणि दिनेश खंबाट हे मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्याशी जोडलेले आहेत.मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांची क्रिकेट लीग टीममध्ये इक्विटी स्टेक आहे, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्लेअर्स बुक वेबसाइट पोर्टल ऑपरेट करण्यासाठी त्याने इतर आरोपींसोबत भागीदारी केली आहे. मोहित बर्मन, गौरव बर्मन आणि हरेशी कलाभाई आणि त्यांचे इतर सहकारी क्रिकेट लीगमधील मॅच फिक्सिंगमध्ये आरोपींच्या सहभागाबाबत अधिक माहिती आणि पुरावे मिळविण्यासाठी त्यांची चौकशी करावी, असेही फिर्यादीचे म्हणणे आहे.

अभिनेता साहिल खानचेही नाव समोर

महादेव ऑनलाइन ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचेही नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी महादेव बुक ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी या 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाची एफआयआर प्रत बाहेर आल्याने एक धक्कादायक खुलासा झाला. त्यानुसार या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचेही नाव आहे. या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 म्हणून अभिनेता साहिल खानचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे अभिनेता साहिल खान याच्यावर महादेव ऑनलाइन ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप आहे. साहिल खान याने केवळ प्रमोशनच केले नाही तर त्याने ॲप ऑपरेट करून त्या माध्यमातून प्रचंड नफा मिळवला, असा आरोप लावण्यात आला.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.