पुण्याहून निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सची टँकरला भीषण धडक, दोन्ही ड्रायव्हरसह तिघांचा जागीच मृत्यू

खासगी ट्रॅव्हल्स आणि टँकर यांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जण ठार झाले आहेत तर 8 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ हा अपघात झाला.

पुण्याहून निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सची टँकरला भीषण धडक, दोन्ही ड्रायव्हरसह तिघांचा जागीच मृत्यू
वाशिममध्ये बस-टँकरचा भीषण अपघात
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 8:47 AM

वाशिम : अकोला नांदेड महामार्गावरील वाटाणे लॉनसमोर बस आणि टँकरचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याहून निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस आणि पाण्याचा टँकर (Water Tanker) यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले आहेत. टॅंकरमधील चालक जागीच मृत्युमुखी पडला, तर खाजगी बस मधील चालक आणि क्लीनर यांनाही जागीच प्राण गमवावे लागले आहेत. जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी वाशिम (Washim) शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्स पुण्यावरुन यवतमाळकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ हा अपघात झाला. पुण्यावरुन यवतमाळला जाणारी खाजगी बस आणि समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या पाण्याच्या टॅंकर यांचा सकाळच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

दोन्ही ड्रायव्हर्सचा जागीच मृत्यू

हा अपघात एवढा भयंकर होता, की टॅंकरमधील चालक जागीच ठार झाला, तर खाजगी बस मधील चालक आणि क्लीनर यांनाही जागीच प्राण गमवावे लागले आहेत.

खाजगी ट्रॅव्हल्समधील 7 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर टँकरमधील एक जण जखमी असल्याची माहिती आहे. 7 ते 8 जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी वाशिम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; 1 ठार, 24 जखमी, 6 गंभीर

एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद

Beed CCTV | सुसाट कारची धडक, अंबाजोगाईत तिघांचा मृत्यू, विजेचा खांबही आडवा