Beed CCTV | सुसाट कारची धडक, अंबाजोगाईत तिघांचा मृत्यू, विजेचा खांबही आडवा

कारने तिघा जणांना जवळपास 100 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती आहे. कारच्या धडकेमुळे रस्त्याच्या बाजूला असलेला विजेचा खांबही आडवा पडला.

Beed CCTV | सुसाट कारची धडक, अंबाजोगाईत तिघांचा मृत्यू, विजेचा खांबही आडवा
अंबाजोगाईत कारचा भीषण अपघात
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 10:51 AM

बीड : सुसाट वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात (Car Accident) झाल्याचा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. कारच्या धडकेत तिघा जणांचा मृत्यू झाला. कारने तिघा जणांना जवळपास 100 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचं दिसत आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई (Ambajogai Beed) तालुक्यातील घाटनांदुरमध्ये ही घटना घडली. अपघाताची दृश्यं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. सोमवारी रात्री उशिराच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की कारच्या धडकेमुळे रस्त्याच्या बाजूला असलेला विजेचा उभा खांबही आडवा झाला आहे. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज अंगावर शहरे आणणारं आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे तिघा जणांना प्राण गमवावे लागले.

नेमकं काय घडलं

सोमवारी रात्रीच्या सुमारास ही कार भरधाव वेगाने अंबाजोगाईकडून घाटनांदूरकडे येत होती. यावेळी कार चालकाचे गाडीवरीवरील नियंत्रण सुटले. रस्त्यावर उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना कारने धडक दिली.

विजेचा खांबही आडवा

कारने तिघा जणांना जवळपास 100 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती आहे. कारच्या धडकेमुळे रस्त्याच्या बाजूला असलेला विजेचा खांबही आडवा पडला.

या अपघातात वैभव सतीश गिरी (वय 28 वर्ष), लहू बबन काटुळे (वय 30 वर्ष) या दोघांनी जागीच प्राण गमावले होते. तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील दोघे जणही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी 3 दिवसात 3 अपघात, अपघाताची दृश्य CCTV त कैद

मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, पाहा घटनास्थळावरचे फोटो

Lift Accident | लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी, पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये अपघात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.