एक टन काचा अंगावर पडून टेम्पो चालकाचा मृत्यू, विचित्र अपघाताने कोल्हापुरात हळहळ
कोल्हापूर शहराजवळील नागाव भागात ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. टेम्पोत काचा भरत असताना क्रेनची तार तुटल्याने विचित्र अपघात झाला. यावेळी एक टन वजनाच्या काचा अंगावर पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला
कोल्हापूर : एक टन काचा अंगावर पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टेम्पोत काचा भरत असताना अपघात झाल्यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले. कोल्हापुरातील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर शहराजवळील नागाव भागात ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. टेम्पोत काचा भरत असताना क्रेनची तार तुटल्याने विचित्र अपघात झाला. यावेळी एक टन वजनाच्या काचा अंगावर पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. संदीप खोरसे असे मयत टेम्पो चालकाचे नाव आहे. कारखाना मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहेत.
साताऱ्यात महिला बाईक रायडरचा मृत्यू
याआधी, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या साताऱ्यातील हिरकणी ग्रुप ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार या महिला बाईक राईडरचा अपघाती मृत्यू झाला होता. 32 वर्षीय शुभांगी यांचे नांदेडजवळ अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघाती निधन झाले. बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सातारा येथील हिरकणी ग्रुप
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या होत्या. नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्याची ही मोहीम होती. त्यांनी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. तिथून तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
नांदेडमध्ये टँकर चालकाची धडक
माहूर गडावर रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा दाभड येथे टँकर चालकाने जोरदार धडक दिली. बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे शुभांगी पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक
आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता
अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू