Accident | परळहून सुटलेली खासगी बस रत्नागिरीत उलटली, चालकाची डुलकी 25 प्रवाशांना महागात
खासगी आराम बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती रस्त्याच्या बाजूला उलटल्याचं उघडकीस आलं आहे. या आराम बसमधून प्रवास करणारे 25 जण जखमी झाल्याचे समजते
रत्नागिरी : खासगी आराम बस रस्त्याच्या बाजूला उलटून (Bus Overturns) मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळबणी गावाजवळ (Mumbai Goa Highway Accident) हा प्रकार घडला. आज (शुक्रवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. खासगी आराम बस रस्त्याच्या बाजूला उलटून झालेल्या अपघातात (Ratnagiri Accident) बसमधून प्रवास करणारे 25 जण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या बाहेर जाऊन उलटली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील परळ येथून केळणे गोमलेवाडी येथे जाण्यासाठी ही बस निघाली होती. शुक्रवार 15 एप्रिल रोजी खासगी आराम बस (एमएच 04 जीपी 2319) ला अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळबणी गावाच्या नजीक सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
25 जण जखमी
खासगी आराम बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती रस्त्याच्या बाजूला उलटल्याचं उघडकीस आलं आहे. या आराम बसमधून प्रवास करणारे 25 जण जखमी झाल्याचे समजते, मात्र जखमी प्रवाशांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.
चालकाला डुलकी लागली अन्…
चालकाला डुलकी लागल्याने बसवरील त्याचे नियंत्रण सुटली आणि बस रस्त्या बाहेर जाऊन उलटली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि घटनास्थळी पोहोचलेल्या मदत ग्रुपच्या स्वयंसेवकांनी प्रवाशांना रुग्णालयात नेले.
संबंधित बातम्या :
उस्मानाबादेत देवदर्शन करून निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 2 ठार, 10 जखमी
Pune accident : वारजे पुलावर विचित्र अपघात, एकाच कुटुंबातले चौघे गंभीर
कसारा घाटात एकामागून एक दोन अपघात, आधी आयशर पलटली, नंतर कंटेनर-कार अपघातात सहा महिला जखमी