Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा ज्ञानेश्वर नागरगोजेचा मोहम्मद शहजाद झाला, हिंदू-मुस्लिम, मुस्लिम-हिंदू, धर्म बदलाची बीडची घटना चर्चेत

बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मांडवा गावात ही घटना समोर आली आहे. लग्नाच्या प्रलोभनापोटी तरुणाने हिंदू ते मुस्लीम आणि पुन्हा मुस्लीम ते हिंदू असे धर्मांतर केले. 35 वर्षीय ज्ञानेश्वर मनोहर नागरगोजे असे या तरुणाचे नाव आहे.

जेव्हा ज्ञानेश्वर नागरगोजेचा मोहम्मद शहजाद झाला, हिंदू-मुस्लिम, मुस्लिम-हिंदू, धर्म बदलाची बीडची घटना चर्चेत
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 9:55 AM

बीड : लग्नाच्या प्रलोभनापोटी दोन वेळा धर्म (Religion Change) बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्ञानेश्वर नागरगोजे (Dnyaneshwar Nagargoje) हा मोहम्मद शहजाद मनोहर झाला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच पुन्हा त्याने  हिंदू धर्मात प्रवेश करत असल्याचा बॉंड जाहीर केला. बीड जिल्ह्यातील परळी (Parali Beed) तालुक्यात ही आश्चर्यकारक घटना घडल्याची माहिती आहे. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी पैसे आणि मुस्लिम मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखवून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मांडवा गावात ही घटना समोर आली आहे. लग्नाच्या प्रलोभनापोटी तरुणाने हिंदू ते मुस्लीम आणि पुन्हा मुस्लीम ते हिंदू असे धर्मांतर केले. 35 वर्षीय ज्ञानेश्वर मनोहर नागरगोजे असे या तरुणाचे नाव आहे.

ज्ञानेश्वरने मुस्लीम धर्मात प्रवेश करत असल्याचं बॉंड पेपरवरुन लिहून दिले. 11 फेब्रुवारीला घोषणापत्र जाहीर केले. त्यानंतर लगेच सहा दिवसांनी म्हणजेच 17 फेब्रुवारीला लग्न-पैशाचे आमिष दाखवून धर्म बदलायला लावला, असा दुसरा नोटरी केलेला बॉंड समोर आला. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

Beed Dnyaneshwar Nagargohe Bond

ज्ञानेश्वर नागरगोजेचे बाँड

यूपीतील धर्मांतराचे बीडमध्ये लिंक

धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे बीडमध्ये सापडण्याचा प्रकार नवीन नाही. याआधी बेकायदेशीर धर्मांतर प्रकरण उत्तर प्रदेशात चांगलेच गाजले आहे. यूपीतील धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन बीडमध्ये असल्याची धक्कादायक माहिती गेल्या वर्षी समोर आली होती. इरफान खान नावाच्या तरुणाला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतले होते. इरफान मूळ बीडमधील परळी तालुक्यातील रहिवासी आहे.

हेही वाचा :

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन, परळीच्या तरुणाला अटक

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.