दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, 70 वर्षीय वृद्धाला जीव घेतला, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग आल्यामुळे एका मद्यपीने दोघांना जबर मारहाण केली. यात एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
अहमदनगर : दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग आल्यामुळे एका मद्यपीने दोघांना जबर मारहाण केली. यात एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ओढत नेऊन झुडपात टाकून देण्यात आला.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग आल्यामुळे एका मद्यपीने दोघांना जबर मारहाण केली. यात एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेहाला ओढत नेऊन झुडपात टाकले. ही घटना श्रीगोंदा शहरात लेंडी नाल्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
बापू विष्णू ओहळ असे मयत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे, तर नामदेव सुनील भोसले ऊर्फ लंगड्या असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
भोसले याने ओहळ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी नामदेव भोसले याने बापू ओहोळ यांच्या नाका-तोंडावर हाताने ठोसे मारून जखमी केले. गळ्याला कपड्याने आवळून खून केला.
वर्ध्यात पैशांच्या उसनवारीवरुन हत्याकांड
दुसरीकडे, उसनवारीने दिलेले पैसे परत न दिल्याने युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील इत्वारा बाजार भागातील मच्छी मार्केट परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. वर्धा शहर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून चाकू जप्त केल्याची माहिती दिली. ही हत्या अवघ्या 500 रुपयांसाठी झाली असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
रुपेश खिल्लारे (रा. इतवारा) असे मयत तरुणाचे नाव आहे. रुपेशने आरोपी निलेश वालमांढरे याच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र पैशाची परतफेड न केल्याने निलेशने रुपेशकडे धोशा लावला होता. यातून दोघांमध्ये वादावादी झाली.
पोटावर चाकूने सपासप वार
भांडण इतकं वाढलं की निलेशने रुपेशच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन हत्या केली. निलेशला शहर पोलिसांनी अटक केल्याची विश्वसनीय माहिती असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा
आरोपी निलेश वालमांढरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दारूविक्री सह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच मृत रुपेश हा देखील त्याच पार्शवभूमीचा असल्याचे समजते.
संबंधित बातम्या :
पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?
वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
पत्नीसह दोघांची हत्या, जन्मठेप भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून